सामाजिक

राजमाता राष्ट्रमाता माजिजाऊ साहेब जन्मोत्सव तथा छत्रपती शिवजन्मोत्सव समितीची संयुक्त बैठक संपन्न! 

पुसद: शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांच्या उत्साहात शिवजन्मोत्सव तथा छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.  दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजन्मोत्सव तथा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने दिनांक १० जानेवारी रोजी शिक्षक पतसंस्था ६७५ चे सभागृह दत्त मंदिराजवळ, मोती नगर पुसद येथे सायंकाळी ५.३० वाजता समाज बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती.

   राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव तथा छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव समितीच्या संयुक्त घेण्यात आलेल्या सभेचे अध्यक्ष म्हणून जेष्ठविधीतज्ञ एडवोकेट माधवराव माने हे विराजमान होते. या कार्यक्रमाला सर्वधर्म समाजातील राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तथा छत्रपती शिवरायांना मानणारे शिवप्रेमी,समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये डॉ.मोहम्मद नदीम, शरद भाऊ मैंद, भारत अण्णा पेन्शनवार, डॉ. स्वप्नील देशमुख, राजूभाऊ सोळंखे, निशांत भाऊ बयास, विश्वास भवरे, दिगंबर जगताप सर, सौ. शुभांगीताई पानपट्टे, एडवोकेट रमेश पाटील, शिवाजीराव देशमुख सवनेकर,डॉ गणेश पाटील, एड भारत जाधव, विश्वजीत सरनाईक, सुधीर देशमुख, राधेश्यामजी जांगिड, मिलिंद उदेपूरकर, हरीश विश्वकर्मा, किशोर कांबळे, लक्ष्मण कांबळे, संतोष अंभोरे, नगरसेविका दिपाली जाधव, ऐश्वर्या बोरकर, विजुभाऊ सोळंके, दीपक काळे, अभिजीत पानपट्टे, राजेंद्र जगताप, अनिल चव्हाण पाटील, लक्ष्मण राठोड, नाना बेले, निखिल गादेवार, जय दळवी, सुशांत महल्ले, चंद्रकांत ठेंगे, अजय क्षीरसागर, राजू उर्फ विनायक केळकर, यु.एन. वानखेडे, दिलीप पाटील, गणेश पावडे, रेश्मा ताई शिंदे, याडीकार पंजाब चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित सेता, प्रकाश लामने, लक्ष्मण कांबळे, दीपक महाडिक यांच्यासह पुसद शहरातील तथा परिसरातील शिवप्रेमी, प्रतिष्ठित समाज बांधव त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.

                   राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या संयुक्त बैठकीमध्ये छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती २०२६ चे समन्वयकपदी राजूभाऊ सोळंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शिवजन्मोत्सव समिती २०३६ चे अध्यक्षपदी हरगोविंद कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर भाऊ देशमुख यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मोहम्मद नदीम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती ची सुरुवात याबाबत यथोचित मार्गदर्शन करित छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ज्योत टाकली. दिगंबर जगताप सर यांनी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त करताना मराठा सेवा संघांनी शिवजयंती बाबत तारीख व तिथीचा जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला होता. तो संभ्रम मराठा सेवा संघाच्या वतीने दूर करून छत्रपती शिवरायांची जयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्यात येणार असल्याचा शासनाला निर्वाळा देत १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्याचा पायंडा घातला. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठविधीतज्ञ ॲड.माधवराव माने यांनी आयोजित होणारी शिवजयंती ही यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात पुसद शहरातून सुरू करण्याचा बहुमान मिळवला असे गौरव काढीत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत देशमुख सर यांनी केले. नितीन भाऊ पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close