पुसद मतदारसंघातील तिन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जा द्या -आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सभागृहात मागणी!

पुसद : मतदारसंघातील ग्रामीण भागाची लोकसंख्या अडीच ते तीन लाखाच्यावर असून बेलोरा, जांबबाजार व काळी दौलतखान या गावची लोकसंख्या २०ते २५ हजार पेक्षा असल्याने या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी विधान परिषद सभागृहात आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी गुरुवार ता.३ ऑगस्ट रोजी केली.या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी येणारी २०२३ ची जनगणना लक्षात घेऊन २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये उपजिल्हा रुग्णालय उघडण्यात येतील असे आश्वासन आमदार डॉ. मिर्झा यांच्या प्रश्नाचे उत्तरात दिले.यासंदर्भात एक बैठक लवकरच लावण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.तत्पूर्वी सभागृहात पुसदची लोकसंख्या एक लाख असल्याची माहिती चुकीचे असल्याचे आमदार डॉ. मिर्झा यांनी सभागृहात स्पष्ट केले.त्यावर व्हेरिफिकेशन करण्यात येईल,असे मंत्री महोदय म्हणाले.पुसद तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न अधिकसंवेदनशील आहे.पुसद येथे उपजिल्हाग्णालय आहे.मात्र, ग्रामीण भागातील दूरवरच्या लोकांना आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होतात.रुग्णांना आरोग्यसेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळण्यात यावी यासाठी २५ हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये उपजिल्हा रुग्णालय उघडण्यात यावे.पुसद तालुक्यातील बेलोरा, जांबबाजार तर महागाव तालुक्यात काळी (दौ) २० ते२५लोकवस्तींची गावे आहेत.बेलोरा हे गाव पुसद वरून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.त्यामुळे दूरवरच्या या गावांना आरोग्य सेवा मिळणे कठीण होते,त्यामुळे बेलोरा, जांब बाजार,काळी (दौ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा तातडीने लाभ घेता येईल.त्यामुळे राज्य शासनाने या गावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे,अशी मागणी एका प्रश्नाद्वारे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी लावून धरली.त्यावर आरोग्यमंत्र्यांनी बेलोरा येथेजिल्हा रुग्णालय उघडण्याचे आश्वासन दिले.व लवकरच या संदर्भात बैठक लावण्यात येईल.नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यात येईल,असे मंत्री महोदयांनी सांगितले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा एकदा सभागृहात!
मागील अधिवेशनात आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी .यवतमाळ येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न मोठ्या पोटतिडकेने उचलला होता.त्यावर तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यात येईल,आश्वासन देण्यात आले होते.प्रत्यक्षात राज्य सरकारने कुठलीही गोष्ट पूर्णत्वास नेली नाही.आमदार डॉ. वजाहत यांनी .यवतमाळ येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा सभागृहात उपस्थित केला.सभागृहात मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळले जात नाही,याबद्दलचा त्रागा त्यांनी व्यक्त केला.पुन्हा एकदा हा प्रश्न उजागर झाल्यानंतर एकदाचासुटेल का ? याकडे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



