आमच्या तीन पिढ्यावर समाजाचे मोठे ऋण-मनीष पाटील!मराठा कुणबी समाजाच्या वतीने मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पाटिल यांचा जाहीर सत्कार

पुसद: येथे तालुक्यातील मराठा कुणबी समाजाच्या वतीने समाजाचे भूषण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवोदित अध्यक्ष युवा नेते मनीष उत्तमराव पाटील यांचा दि.८ ऑक्टोंबर २०२३रोजी पुसद येथील शासकीय विश्राम गृहावर झालेल्या कार्यक्रमात शाल श्रीफळ आणि पुष्पहार प्रदान करीत पेढा भरवून सन्मान करण्यात आला.. मराठा युवा मंचचे दीपक काळे व सुशांत महल्ले यांनी आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याला मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप सर, संभाजीराव टेटर, विजयराव खंदारे पाटील , दिलीप पाटील कान्हेकर सर यांचेसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते.. या कार्यक्रमाला नवोदित संचालक साहेबराव कदम, अनुकूल चव्हाण, स्नेहल भाकरे, संजय मोघे यानांही सन्मानित करण्यात आले.. महागाव तालुक्यातील उटी चे सरपंच गावंडे, वानखेडे यांनी सत्कार केला.या प्रसंगी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विशाल जाधव, मधुकर कलिंदर, संतोष भेंडे, राजू वाकडे यांच्या वतीने मनीष पाटील यांचा सत्कार करन्यात आला..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनिल ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन सुशांत महल्ले यांनी केले…