दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी;रस्त्यांवरच थाटतोय बाजार; व्यापारी त्रस्त वाहतुकीचेही तीनतेरा!

पुसद : शहरात सणासुदीच्या काळात रस्त्याच्या मधोमध हात गाडीवाले किरकोळ व्यावसायिकांनी दुकाने थाटली असल्यामुळे मोठ्या याचा व्यावसायिकांवर परिणाम होत आहे तर एकीकडे वाहतुक नियमांचे तीनतेरा वाजत आहेत. यासंदर्भात नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग आणि शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे वाहतूक पोलीस वसुलीत मग्न आहेत त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.दिवाळी सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येवून ठेपला आहे. तसेच दिवाळी सणाचाही नागरिकांना वेध लागले आहेत. यानिमित्त कपड्यांसह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ होत आहे. किरकोळ दुकानांसह बड्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंत अतिक्रमण असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आठवडी बाजार, कापड लाईन, सराफा गल्ली आदी भागांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तर अतिक्रमणधारकांनी रस्त्यातच दुकाने थाटली जात असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळित होत आहे. रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यासोबतच बड्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. या सर्व प्रकारणावर नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस मूग गळून बसले आहेत. या अतिक्रमण धारकावर कुठल्याही प्रकारची कोणतीच कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अतिक्रमण व्यावसायिकांमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने कापड व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. तर अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्था तर विस्कळित होतच. आहे शिवाय रस्त्यावर दुतर्फा कचरा आणि धुळीचेही साम्राज्य निर्माण होत आहे. एकीकडे महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे दिवाळीच्या ऐन तोंडावर शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे महिला भगिनी व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनी आपल्या ग्राहकांना दिवाळी नीट खाऊ देणार की नाही, असा प्रश्न केला जात आहे.सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही अचानक वीज गायब होत असल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या सणात वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यवसाय बंद पडत आहेत. या कालावधीत व्यावसायिकांचे काम वेगाने सुरू असते मात्र वीज गेल्याने अनेकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.सायंकाळी सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचा आलेला मालावर भाव टाकून माल रॅक मध्ये लावावा लागतो पण सेटर बंद असतानाही पोलीस मात्र रात्री अपरात्री व्यापाऱ्यांना धमक्या देतात पण शहरातील व वाहतूक कोंडी व अतिक्रमावर मात्र मूग गिळून गप्प राहतात त्यामुळे कापड व्यावसायिकांवर संक्रांत येण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे.



