आबई फाटा येथे चार तास चका जाम आंदोलन!

वणी/प्रतिनिधी (शुभम कडू) : उद्धव बाळा साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेअंतर्गत माजी आमदार विश्वास नांदेकर व संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली आबई फाटा येथे चार तास वाहतूक अडविण्यात आली.
वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीतला कोळश्याची वाहतूक ही वर्धा नदीच्या पात्रात वेकोलीतर्फे बनविण्यात आलेल्या कच्या स्वरूपाच्या राफ्टर पुलावरून होत होती. उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने हा राफ्टर पूल वाहून गेल्याने आता वेकोलीच्या कोळश्याची वाहतूक घुग्घुस सायडिंग पर्यंत मुंगोली सिंदोला शिरपूर मार्ग होत असल्याने तसेच कोलगाव, नायगाव या खाणीतील कोळसा वणी येथे जात असल्याने संपूर्ण परिसरात जडवाहतुकीमुळे अपघातांच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे.
तरिही वाहतूक पूर्णतः बंद करून जुन्या पुलाची दुरुस्ती करून वाहतूक नकोडा घुग्घुस मार्ग वळवावी तसेच – मोहदा येथुन होणाऱ्या गिट्टीच्या जडवाहतुकीला पूर्णतः आळा घालावा यासोबतच मुंगोली गावाचे तातळीने सर्व सोयीयुक्त पुनर्वसन करण्यात यावे. बेरोजगार युवकांना वेकोली अंतर्गत माती उत्खणन करणाऱ्या कंपनीत कामावर घेण्यात यावे. ही मागनी करन्यात आली, मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला .
यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर,उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे,उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे ,तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, युवा वणी शहर प्रमुख सुधीर थेरे, उपशहर प्रमुख महेश चौधरी,उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे, संभाजी मत्ते,जीवन डवरे,सुभाष भोगळे, मोरू पोतराजे,निलेश बेलेकर, प्रवीण वरारकर, गीता उपरे, स्वाती राजूरकर आणि शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.



