चर्चानां पुर्णविराम!अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर

नागपूर/प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. १५) पार पडला. यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. भाजपमधील १९, शिंदेंच्या शिवसेनेतील ११ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झाले नव्हते. मंत्रिमंडळाचे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच अखेर महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यामध्ये, अखेर गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे.महायुतीच्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला होता. त्यात आज हिवाळी अधिवेशनचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे खातेवाटप कुठं रखडलंय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी मोठ्या घडामोडी दिसून आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार चहापानासाठी पोहोचले होते. यामुळे खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच महायुतीच्या काही आमदारांनी खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे खातेवाटप नेमके कधी जाहीर होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
कॅबिनेट मंत्री कोणाला कोणतं खातं?
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गणेश नाईक – वन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – शालेय शिक्षण
गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
संजय राठोड – मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार
अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
माणिकराव कोकाटे – कृषी
दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – कापड
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – वाहतूक
भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण योगेश कदम – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण



