सक्सेसफुल पॅरेंटिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन; विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचा पुढाकार
पाल्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी

पुसद: शहरातील नामांकित शाळा विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल आणि अमरावती येथील ट्रेन ओ ब्रेन या संस्थेद्वारे पालकांसाठी एक दिवसीय सक्सेसफुल पॅरेंटिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात दिनांक 20:01:24 ला दुपारी दोन ते सहा या वेळामध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेत अमरावती येथील इंटरनॅशनल ब्रेनॉलॉजिस्ट व कौन्सिलर अखिलेश बैतुले तसेच देश के मेंटॉर, मोटिवेशनल स्पीकर संदीप मुर्तडकर हे पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.गेल्या काही वर्षात विज्ञान क्षेत्रामध्ये झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आपणास अनेक भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे आपले दैनंदिन जीवन व राहणीमान उंचावले आहे, परंतु त्याचे काही दुष्परिणामही सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाबाबत अनेक समस्या आज पालकांसमोर निर्माण झालेल्या आहेत, तर अनेक पालक आपल्या पाल्यांसमोर हतबल झालेले आपल्याला दिसत आहेत या परिस्थितीला केवळ विद्यार्थी जबाबदार आहेत असे आपणास म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यासोबतच पालकही काही अंशी निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार आहेत असे म्हणणे वावगे होणार नाही. आज पालकांसमोर निर्माण झालेल्या अनेक समस्यांचे निराकरण या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत.पालकांचे विद्यार्थ्याप्रती ध्येय, विद्यार्थी आणि पालकांचे संबंध, पालकांचे टाईम मॅनेजमेंट, मुलांचे अभ्यास न करणे, मुलांचा वाढलेला चिडचिडपणा, मुलांच्या मनात मोठ्यांबद्दल नसलेली आदराची भावना या आणि अशा विविध बाबींवर चर्चा व मार्गदर्शन या कार्यशाळेत पालकांना मिळणार आहे आणि पालकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण कसे करावे याहीविषयी पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे त्यामुळे या कार्यशाळेचा लाभ सर्व पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळेचे संचालक शरद मैद, सुरज डुबेवार, संतोष अग्रवाल, मनीष अनंतवार संगमनाथ सोमावार व प्राचार्य अनुपमा भट देशमुख यांनी केले आहे.



