दहेकर कोचिंग क्लासेस येथे Felicitation ceremony Programme संपन्न!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : वणी येथील सुप्रसिध्द दहेकर कोचिंग क्लासेस येथे 12th & MHT-CET Toppers विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. 27/06/2023 ला संपन्न झाला. यावेळी दहेकर कोचिंग क्लासेस मधील 12th मध्ये वणी तालुक्यातून विज्ञान शाखेमध्ये Toppers आलेल्या 1st Topper युक्ता बैद, 2nd Topper श्रावणी बोर्डे, 3rd Topper सोनम चंदेल या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच MHT-CET मध्ये Toppers आलेल्या तुषार कुंभारे, पल्लवी भोयर, सोनम चंदेल, पुजा गुरनुले, गायत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थांनी सत्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त करताना कशाप्रकारे अभ्यास करत यश संपादन केले आणि दहेकर कोचिंग क्लासेसची असलेली महत्वाची भूमिका याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन दुमोरे यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधताना दहावी-बारावी च्या अभ्यासक्रमाचे वर्षभराचे, महिन्याचे, हफ्ताचे योग्यरित्या नियोजन करून अभ्यास केला तर यश नक्की मिळते, असे सांगितले तर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल ठाकरे यांनी अकरावी-बारावी हे आयुष्यातील टर्निंग पॉइंट पासून करियर च्या दृष्टीकोनातून किती महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बलवंत दहेकर सर यांनी दहेकर कोचिंग क्लासेस ची पार्श्वभूमी सांगितली तसेच पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पटेल सर, गोहोकार सर आणि 11-12 वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार मॅडम तर उपस्थितांचे आभार पटेल सर यांनी मानले. दहेकर कोचिंग क्लासेस हे 2002 ला Science & Commerce faculty साठी स्थापन झाले. 2010-11 पासून दहेकर कोचिंग क्लासेस मध्ये Science faculty ला पटेल सर, गोहोकार सर आणि केदार मॅडम यांनी भार सांभाळला. त्यातून आज एक मोठा वटवृक्ष तयार झाला. दहेकर कोचिंग क्लासेस Science & Commerce faculty 2002 पासून अविरत विद्यार्थ्यांच्या सेवेत आहेत.
सलग 13 वर्षापासून दहेकर कोचिंग क्लासेस चे वणी तालुक्यात Toppers आहेत. हीच परंपरा अजूनही अविरत चालूच आहे. दहेकर क्लासेस मधील विद्यार्थी हे पुढील शिक्षणासाठी नामांकित गव्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि वैद्यकीय कॉलेज मध्ये गेले आहेत. जसे COEP,PICT,VJIT,UMMENS Women’s College मध्ये जातात. विद्यार्थांनी विविध क्षेत्रामध्ये जावून नाव कमावले आणि दहेकर क्लासेस चे नाव मोठे केले. यामध्ये विविध दहेकर कोचिंग क्लासेस चा खात्रीशीर 100% result आहे. तरीही एकदा दहेकर कोचिंग क्लासेस ला अवश्य भेट द्या.



