राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत वालतुर तांबडे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक कामगिरी!

पुसद : विभागिय राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये पुसद तालुक्यातील वालतुर तांबडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विभागीय मैदानी स्पर्धेत अंडर १४ मुले या वयोगटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतूर तांबडे येथील विद्यार्थी भावेश ज्ञानेश्वर राठोड ८० मी. हर्डल्स मध्ये विजयी व आर्यन भारत राठोड थाळी फेक मध्ये विजयी झाले. काल उंच उडी मध्ये आराध्या शालिक गव्हाळे विजयी झाली होती. या तिन्ही विद्यार्थ्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेमधून राज्यस्तरासाठी निवड झालेली वालतूर तांबडे शाळेने नेत्रदिपक कामगिरी केलीआहे त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी प्रल्हाद जाधव, मुख्याध्यापक मधुकर मोरझडे, भारत राठोड, प्रफुल्ल पांडे, जयसिंग चव्हाण, विकास वाकडे, रोहिदास पवार,श्रीराम आढाव, संभाजी हंगरगे, आलासिंग राठोड, बीबीषण राठोड, संतोष तांबारे, दिलीप जाधव, दयाराम इंगोले, सुभाष चिरंगे, राजुसिंग पवार, परमानंद राठोड, गजानन हमाने, सुभाष पोलीस पाटील,उदल जाधव, राहुल जाधव, बलदेव राठोड, रवी राठोड, केवल भिसे, ग्रामसेवक साखरे साहेब, तलाठी राऊत साहेब, नारायण अंबोरे साहेब कृषिसेवक, गोपाल ढोणे व वालतूर तांबडे येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



