ईतर

फटाक्यांची आतिशबाजी अन् भला मोठा हार; पुसदमध्ये आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्र्यांचं जंगी स्वागत!

पुसद : विधानसभा निवडणुकीत आमदार इंद्रनील नाईक यांनी दुसऱ्यांदा ९१ हजाराच्या मतांच्या वर आघाडी घेत घवघवीत यश संपादन केले. तर पुसदचा राज्याच्या राजकारणामध्ये नाईक घराण्याचा दबदबा कायम असल्याचे कै. वसंतराव नाईक साहेब यांचे नातू इंद्रनील नाईक यांनी निकालातून दाखवून दिले. नविन सरकारमधील मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री म्हणून विराजमान झाले. मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर आज त्यांचे मतदार संघात प्रथम आगमन झाले. दुपारी अडीच वाजता च्या सुमारास फटाक्यांची आतिशबाजी अन् भला मोठा हार घालून त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.सुधाकरराव नाईक यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या विजयाचा सर्वात मोठा वाटा असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक उपस्थित होत्या. स्वागत मिरवणूक ही पुढे मार्गक्रमण करीत प्रत्येक चौकामध्ये चाहत्यांनी ना. इंद्रनिल नाईक यांचे भव्य स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून भव्य असा पुष्पहार त्यांना घालण्यात आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण केली. पुढे मिरवणूक महात्मा फुले चौक, ग्रामीण रुग्णालय चौक या ठिकाणी लाडक्या बहिणीने त्यांचे स्वागत केले. तर पुसदच्या बंगल्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी सपत्नीक आपल्या मातोश्रीचा आशीर्वाद घेतला. शहरामध्ये अभूतपूर्व असे त्यांचे भूतपूर्व करण्यात आले हे विशेषतः यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी यांच्या फौजफाट्यासह अदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close