धोकादायक दगडाच्या खदानी जवळ शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळेचे प्रस्तावित बांधकाम करु नका; संबंधित विभागाकडे सामाजिक कार्यकर्त्याची मागणी!

पुसद: येथील आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेचे प्रस्तावित बांधकाम शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर भोजला येथील ई-क्लास जमिनीवर गट क्रमांक २७२या प्रस्तावित जागेवर करण्याचे आयोजन आहे. परंतु सदर जमिनीला लागून खाजगी दगडी खदान असून भविष्यात या शाळेच्या इमारतीसाठी व येथील निवासी विद्यार्थ्यांसाठी हे धोकादायक असल्याने सदर प्रस्तावित बांधकाम त्या ठिकाणी न करता इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे अशा आशियाची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्त्याच्यां वतीने आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद तसेच आदिवासी विकास मंत्र्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रम शाळा वडगाव (शिंदे) ही सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. या शाळेच्या इमारतीसाठी व आदिवासी मुला-मुलींची दोन वसतिगृहे, आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा, आदिवासी सांस्कृतिक भवन व आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी वारंवार समाज बांधवांनी आंदोलन केले निवेदन दिले.या सर्व प्रकल्पांसाठी काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सूतगिरणीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली परंतु ती जागा उपलब्ध करून न देता शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेसाठी शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील धोकादायक जागा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे आता या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेच्या इमारतीचे बांधकाम भोजला येथील गट क्रमांक २७२या प्रस्तावित जागेवर करण्याचे आयोजन केले आहे. पंरतु सदर गट क्रमांकाला लागुन खाजगी दगडीखदान आहे.
ही इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा असल्याने या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सदर प्रस्तावित जागेवर झाल्यास बाजूलाच दगडीखदान सुरू असल्यामुळे खाणकाम साइटच्या काठावर विहिरीसारखे भल्ले मोठे
खड्डे पडून असून त्या खड्ड्यामध्ये पाणी साचुन असते आणि तेथे स्फोटकांच्या मदतीने, दगडाचे थर तोडले जातात, जे नंतर जेसीबी मशीनच्यासाह्याने डंपर ट्रकमध्ये लोड करुन वाहतूक केल्या जात आहे अशा स्फोटक पद्धतीचा वापर करून दगड मिळवली जाते या खाणकामामुळे या परिसरात शाळेच्या इमारतीचे बांधकाम झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेच्या इमारतीचे बांधकाम भोजला येथील गट क्रमांक २७२या प्रस्तावित जागेवर केल्यास सबंधित विभाग जाणीवपूर्वक या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत.
त्यामुळे संबंधित प्रशासने प्रस्तावित जागेचा संपूर्ण विचार करून इतरत्र जागा शोधून आदिवासी विभागाने मास्टर प्लॅन तयार करुन सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम इतर कुठल्याही सुरशित जागेवर करावे शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे व मुलांचे व मुलींचे वसतीगृहाचे सर्व सुविधायुक्त दर्जेदार इमारतीचे काम करावे. अशा आशयाची तक्रार व निवेदन सामाजिक कार्यकर्ते च्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.जर संबंधित विभागाने अशा धोकादायक जागेवर निवासी आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे बांधकाम केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.



