क्राइम

आरटीओ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप;भ्रष्टाचाराचे कधी भरले माप.?प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तीन अधिकाऱ्यासह एका खाजगी एजंटला रंगेहात पकडले

पुसद : येथील शासकीय विश्रामगृहावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या पथकाने छापा मारल्याच्या घटनेनंतर काही वेळ खळबळ उडाली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा पंचकोशी चर्चिल्या जात होत्या. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या आरटीओ कार्यालयाच्या विभागातील भ्रष्टाचाराचे माप कधी भरेल, असे प्रश्नही काही नागरिक विचारत होते.कारवाई सुरु असताना परिसरात सन्नाटा पसरला होता. प्रत्येकजण दूर उभे राहून काय सुरु आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण या कारवाईमुळे अभिनंदन म्हणत झालेल्या कारवाईबद्दल समाधानही व्याक्त करत होते.यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळचे१) सुरज गोपाल बाहीते, पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, २) मयुर सुधाकर मेहकरे, वय ३० वर्ष, पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ३) बिभिषण शिवाजी जाधव, वय ३० वर्ष, पद सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सर्व वर्ग ३, नेमणुक तसेच आरोपी क्रमांक ४) बलदेव नारायण राठोड, खाजगी ईसम (एंजेन्ट) यांना ताब्यात घेऊन वसंत नगर पोलीस स्टेशन पुसद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत झेप न्यूज सुत्रांनी दिलली माहिती अशी की,तक्रारदार या सरकार मान्य ड्रायव्हींग स्कुलच्या संचालीका असुन त्यांनी दि ७मे२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आर.टी.ओ. कॅम्प दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थी यांना शिकावू व कायम पक्का परवाना (License) देणे करीता खाजगी ईसमाच्या माध्यमातुन संगनमत करून अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त प्रत्येक फॉर्म मागे २००/- रुपये अतिरिक्त स्वतः करिता लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे दाखल केली होती त्यावेळी लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता संबंधितांनी लाचेची रक्कम स्विकारण्याचे सिध्द झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि १६मे२०२५ रोजी आयोजीत केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान एकुण १० क्लास करीता २००/- रुपये प्रमाणे रू. २,०००/- लाच रक्कम आरोपी क्रमांक ४) बलदेव नारायण राठोड, खाजगी ईसम यांचे मार्फतीने तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता आलोसे कमांक ०१ ते ०३ व आरोपी क्रमांक ०४ यांना रंगेहात पकडण्यात आले.पोलीस स्टेशन वसंतनगर येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, पोना सचीन भोयर, राकेश सावसाकडे, पोशि सुरज मेश्राम, मपोशि सरिता राठोड व चालक पोना अतुल नागमोते सर्व नेमणुक ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत ॲन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फ्रि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close