प्रा.डॉ.अनुश्री.अ.पुरी(बन) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक २०२६ च्या पुरस्काराने सन्मानित!

पुसद : येथील प्रा.डॉ.अनुश्री.अ.पुरी(बन) यांना दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे बी द चेंज फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक २०२६ च्या सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून या सोहळ्यासाठी देशातील विविध राज्यातून आलेल्या शिक्षक वृंदाचा सत्कार सन्मान करण्यात आला. शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून त्यांच्या नि:स्वार्थी सेवाभावाचा गौरव व्हावा या उद्देशाने बी द चेंज फाउंडेशन तर्फे श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागात प्र.विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. अनुश्री पुरी (बन) यांना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय माजी सैनिक अधिकारी श्री.अरुण भंडारे, मा.अभिनेत्री सौ.निवेदिता पगार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, बॅच व श्री साईबाबा यांची पावन प्रतिमा आणि महाराष्ट्रीयन फेटा देऊन डॉ. बन यांना मुंबई येथून गौरविण्यात आले. हा पुरस्कार डॉ.बन यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध स्तरावर केलेले कार्य त्यासोबतच कर्तव्यनिष्ठ, समाजभिमुखता,संशोधक, समाजशास्त्र अभ्यासक,लेखिका म्हणून केलेले कार्य व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली अविरत सेवा आणि योगदान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व व विद्यार्थी प्रिय असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना 2025 च्या महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले होते. विविध मान्यवराच्या उपस्थित राष्ट्रीय आदर्श शिक्षक 2026 पुरस्कार डॉ. बन यांना सन्मानित केले असून या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची समाजातील विविध स्तरातून प्रशंसा होत आहे.उपस्थित मान्यवरांने त्यांचे अभिनंदन करून हा पुरस्कार अधिकच प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त करीत भविष्यात शैक्षणिक कार्यात आदर्श शिक्षक घडावावा अशी सदिच्छा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. डॉ.अनुश्री अनिल पुरी( बन) यांचे प्रेरणास्थान नाईक कुटुंबीय असून या यशाचे श्रेय संस्थेचे मा.श्री.जयभाऊ नाईक अध्यक्ष, जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद, मा. श्री मनोहरभाऊ नाईक सचिव, जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद, यांना दिले आहे व डॉ.बन यांनी बी द चेंज फाउंडेशनचे धन्यवाद मानले आहेत.



