शैक्षणिक

माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहात साजरा!

पुसद : येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रिडा दिवस अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या देशाला अनेक सुवर्णपदके मिळवून दिले. म्हणून त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती चेतना क्रिडा मंडळ पुसदचे अध्यक्ष विरेंद्र राजे, अखिल सर, शेख मसूद (पीएसआय), प्रितीन आहाळे सर, नंदूभाऊ चौधरी ( निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांची होती. सदर कार्यक्रमात बुद्धिबळ,टेबल टेनिस, कुस्ती, फुटबॉल, कराटे,रनिंग व इतर अनेक क्रिडा प्रकारांच्या स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत सहभाग नोंदवून यश प्राप्त केले.अशा सर्व विद्यार्थ्यांचे सदर कार्यक्रमात सत्कार करण्यात आले. पार्थ पवार या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकले. तसेच क्रिडा प्रशिक्षक ऋतुजा मॅम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरील उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या अकॅडमिक डायरेक्टर, शाळेचे मुख्याध्यापक, प्रशासनाधिकारी, शाळा समन्वयक ,सर्व क्रिडा प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन आकाश खंदारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close