दारूबंदीसाठी महिला धडकल्या थेट पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात

पुसद : तालुक्यातील चोंढी येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे. या धंद्यांना गावात ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना नाहक त्रास होत आहे.तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारुच्या व्यसनाला बळी पडत आहेत या गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे गावामधील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीत होऊन महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे.वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिलांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यावर धडक दिली. ‘आमच्या येथील दारूविक्री बंद करा’ सदर अवैध दारू विक्री वर प्रतिबंध करून अवैध दारू विक्रीची पाळेमुळे शोधून संबंधितांना कडक शासन करून कारवाई व्हावी.अशी मागणी यावेळी पोलिस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोंढी गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे. या धंद्यांना गावात ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना नाहक त्रास होत आहे.तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारुच्या व्यसनाला बळी पडत आहेत या गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे गावामधील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीत होऊन महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे.त्यामुळे गावातील महिलांनी मोठ्या संख्येने दारू बंद करण्यासाठी पुढाकार घेतला असून थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक दिली आहे.गावातील दारुड्या पुरुषांना कंटाळून अखेर चोंढी येथील महिलांनी गावातील दारू अवैध धंदे बंद होण्याकरिता स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन दारूबंदी करण्याचा निश्चय केला.व तसे निवेदन त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले त्यावेळी पोलिसांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आश्वासन दिले परंतु विशेष म्हणजे या बिटमध्ये बिटजमादाराची ड्युटी असतांनाही खुलेआम अवैध धंदे सुरू असतात एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्याचा कांगावा करीत असले तरी या चालू अवैध गावठी देशी दारू विक्रीच्या धंद्यांना पाठबळ कोणाचे? हे न समजणारे कोडे आहे.या गावात हातभट्टीचे व देशी दारूचे प्रस्त वाढले आहे. हे मात्र या महिलांनी पोलीस ठाण्यात येऊन उजागर केले परंतु हजारो लिटर हातभट्टी दारू तयार करून विक्री होत आहे. याकडेही कानाडोळा कोण करीत आहे. हे मात्र सिद्ध झाले आहे. अवैध धंदे, ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, हातभट्टीचे वाढते प्रस्थ यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या ठिकाणाहून पोलीस प्रशासनाला मोठा महसूल मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अवैध धंद्याबाबत कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. कारवाई न करण्यामागे पोलिसांचा हेतू काय आहे, असा प्रश्न नागरिकातून चर्चिला जात आहे. विशेष जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या अवैध धंदे बंद करण्याच्या आदेशाला संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व बिटजमादार यांच्याकडून केराची टोपली दाखविली जात आहे. या महिलांच्या निवेदनाकडे निवेदनाकडे आताा तरी वरिष्ठठ पोलीस अधिकाऱ्याने लक्ष द्यावे द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.हे निवेदन देते वेळेस चोंढी येथील मोठ्या संख्येने महिला वर्ग गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



