राजकिय

येणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो पक्ष संटनेसाठी जोमाने कामाला लागा!-डॉ.मोहम्मद नदिम प्रदेश सचिव

पुसद:परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटनेसाठी व येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूकसाठी जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन डॉ.मोहम्मद नदिम काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी केलेआहे.

पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यकारिणीच्या बैठक शुक्रवारी दि.२ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास वाघमारे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पुसद शहर निरीक्षक गोपालजी अग्रवाल अध्यक्ष शहर काँग्रेस उमरखेड, हे होते तर प्रमुख पाहुणे कृष्णा भाऊ देवसरकर जिल्हा काँग्रेस कमिटी व ग्रामीण निरीक्षक रामभाऊ देवसरकर माजी सभापती जिल्हा परिषद यवतमाळ संजयभाऊ मोघे माजी सभापती पंचायत समिती दिग्रस ॲड. सचिन नाईक उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.मोहम्मद नदिम सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी सय्यद इस्तियाक महासचिव प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक जाफर एन खान अध्यक्ष जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस अनिल शिंदे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, जिया शेख अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, ज्ञानदीप कांबळे कार्याध्यक्ष पुसद तालुका काँग्रेस हे होते.

या बैठकीचे प्रास्तावीक कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे यांनी केले. या आढावा बैठकीमध्ये फक्त विस्तार करणे तसेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या त्यामध्ये अब्दुल वहाब अब्दुल लतिफ यांना जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष शेख जब्बार (लाखे)शेख लतिफ शहर अल्पसंख्याक अध्यक्ष इमरान खान शे. पिंपरी यांची तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी नियुक्त्या देण्यात आले.तसेच आज रोजी पक्षामध्ये नवीन लोकांच्या पक्ष प्रवेश देण्यात आले त्यात रंगराव भडंगे सरपंच पाळूवडी डॉ. जामगाडे प्रवीण भडंगे पळुवली धोंडबा बळी,शंकर गव्हांडे, माधव बोडखे कोंढई, इब्राहिम भाई खडकदरी, नागेश राऊत, सुनील कांबळे, धुळे यांना मान्यवरांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आले.

बैठकीच संचलन झिया शेख यांनी केलं तर आभार जब्बार लाखे यांनी मानले.या बैठकीला काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिलाश खैरमोडे,विधानसभा युवक अध्यक्ष नईम इजारदार,उपाध्यक्ष शाहिद मिर्झा, वाहतूक शाखा जील्हाउपाध्यक्ष सैयद जानी,माजी नगरसेवक अब्दुल समद, बळीराम चव्हाण,युवक जिल्हा सचिव सोहेल चव्हाण, हकिमोद्दिन सिद्दिकी,पाशा खान, माहेफुज खान,इस्राईल गुड्डू,मुजहीद शेख, अशोक पवार,संजय कन्हेड,राहील खान,जिमाद खान,फरहान अवि कांबळे धम्मपाल वाघमारे अभी कांबळे आकाश पाईकराव चेतन कांबळे राहुल वाघमारे अमोल कांबळे श्यामसुंदर पठाडे भगवान डोंगरे सुरेंद्र डाखोरे राजू सलगर आदि पाईकराव ,सह शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस,अल्पसंख्यक काँग्रेस,सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close