ईतर

पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील बोगस ‘हॉट मिक्स प्लांट’ चे जिओ टॅगिंग करण्याचे आदेश! चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या! 

पुसद:सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ते विकास कामांमध्ये काही कंत्राटदाराकडून बोगस किंवा अस्तित्वात नसलेल्या प्लांट ची खोटी माहिती देऊन बिले लाटण्याचा प्रकार समोर आल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या विभागाच्या अतिरिक बोगस ‘हॉट मिक्स प्लांट’सुरू असल्याची तक्रार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाखल केली होती त्याच अनुषंगाने आता यवतमाळ सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सहात्रे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ”हॉट मिक्स’ प्लांट चे तात्काळ जिओ ट्रॅगिग करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ज्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत अशा बोगस हॉट मिक्स प्लांट धारकांना शासनाच्या निधीतून कोट्यावधी रुपयाचे कामे देऊन शासनाच्या निधीचा अपहार केला त्याच अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे’जिओ ट्रॅगिग’ करण्याचे आदेश देण्यात आल्याने ज्या बोगस कंत्राटदाराचे हॉट मिक्स प्लांटचे नाव दिले आहे, तो प्लांट प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याचे अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) नोंदवून जिओ टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले मात्र या जिओ टॅगिंग तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे.ज्यांची चौकशी करायची त्यांच्यावरच हे काम सोपविल्याने कारण चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखे असल्याचे या प्रकरणाची चौकशी लालफितीच्या चक्रात अडकणार की काय? अशी चर्चा सध्या परिसरात सुरूआहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेल्या जवळपास १७ बोगस हॉट मिक्स प्लांट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह इतर अभियंताने संबंधित ठेकेदारांसोबत संगणमत करून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे ‘हॉट मिक्स प्लांट’ दाखवून रस्ते किंवा इतर बांधकामांची कामे लाटुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे शासनाच्या निधीची संबंधित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी शासनाला लाखो रुपयांचा चुना लावून भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाखल केली होती त्या प्रकरणाची गंभीर दखल यवतमाळ सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय साहत्रे यांनी घेतली असून ज्यांची चौकशी करायची त्यांच्यावरच आता थेट हॉट मिक्स प्लांट चे जिओ टॅगिंग करून अहवाल सादर करण्याचेआदेश देण्यात आले त्यामुळे ‘चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या’दिल्याने या प्रकरणाची चौकशी लालफितीच्या चक्रात अडकणार की काय असा प्रश्न तक्रारकर्त्यांना पडला आहे. परंतु ज्या कंत्राटदारांनी हॉट मिक्स प्लांटचे नाव दिले आहे, तो प्लांट प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याचे अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) नोंदवून जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असताना मात्र आजपर्यंत अशा बोगस कंत्राटदारांनी कोट्यावधीचे शासनाच्या निधीतून कामे करून शासनाचा निधी लाटला आहे. जर ही तपासणी ज्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत सबंधित कंत्राटदारासोबत संगणमत करून अशा कंत्राटदारांना लाभ पोहोचविला किंवा बोगस हॉट मिक्स प्लांट केवळ कागदावर दाखविले असती तर अशा बोगस हॉट मिक्स प्लांट धारकांना पाठीशी घालणाऱ्या सबंधित अधिकाऱ्याकडून निपक्ष तपासणी किंवा जिओ ट्रेगिग करण्याचे काय कारण त्यामुळे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांनी या प्रकरणाची ती सदस्य समिती स्थापन करून वरिष्ठ स्तरावरून अशा बोगस हॉट मिक्स प्लांटची तपासणी करून जिओ ट्रेगिग करण्यात यावे व संबंधित बोगस हॉट मिक्स धारक कंत्राटदारावर शासनाची फसवणूक करून निधी हडप केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच शासनाला शासकीय निधीत चुना लावला प्रकरणी लोकसेवक संबंधित कार्यकारी अभियंता यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये या भ्रष्टाचाराची नोंद करण्यात यावी.तरच ही तपासणी मोहीम योग्य रित्या काम करेल अन्यथा अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असली तरीही ही तपासणी म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखे असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close