ईतर

श्रावण मासानिमित्त बेल झाडाचे वृक्षारोपणासाठी वाटप…

पुसद :  श्रावण मासानिमित्त आई सप्तशृंगी देवी महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या बेल झाड वृक्षारोपणाकरिता परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर बेल झाडाचे रोपटे वाटप करण्यात आले.    मोहिनी ताई नाईक तथा अनिल चव्हाण (पाटील)मित्र मंडळ इटावा वार्ड यांच्या संकल्पनेतून श्रावण मासाचे निमित्याने बेल झाडाचे वृक्षारोपण करण्याचे आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत आई सप्तशृंगी देवी महिला मंडळ इटावा वार्ड च्या प्रतिष्ठित महिलांनी परिसरातील महिलांना आमंत्रित करून विधिवत वृक्षाचे पूजन करून एकमेकींना ऑक्षण करीत मोठ्या बेल झाडाचे वृक्षारोपणाकरिता मोठ्या उत्साहात आई सप्तशृंगी देवी मंदिर इटावा वार्ड येथे वाटप करण्यात आले.

परिसरातील महिलांनीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदवित प्रतिसाद दिला. बेलवृक्ष झाडाचे वृक्षारोपण केल्यानंतर त्या झाडाचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी बेल वृक्ष रोपटे घेणाऱ्या प्रत्येक महिलांनी करण्याचे अभिवचन दिले. अती उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close