ईतर

डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) यांना लोकमत यवतमाळ गौरव अवॉर्ड २०२६च्या सन्मान कर्तृत्वाच्या पुरस्कारांने सन्मानित

पुसद : येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) तथा तालुका महिला अध्यक्ष लघु उद्योग भारती पुसद व प्रोप्रा.ऐश्वर्या अँग्रो इंडस्ट्रीज पुसद आणि विशेष म्हणजे गोसीवी सेना समाजांच्या विदर्भ अध्यक्ष (महिला आघाडी) अश्या विविध क्षेत्रातील त्यांनी आपले योगदान दिले असून समाजशास्त्राच्या अभ्यासक व यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या कार्याची छाप समाजात निर्माण केल्यामुळे त्यांच्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत मलटी मीडिया लोकमत समूहा कडून त्यांना गौरवण्यात यवतमाळ गौरव अवॉर्ड २०२६चा विशेष अतिधी आदरणीय मा.ना.श्री.अशोक उईके साहेब अदिवासी विकासमंत्री,म.रा तथा पालक मंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले या सोहळ्याला प्रमुख उपस्थित असलेले मा.श्री.बाळासाहेब मांगूळकर आमदार यवतमाळ विधानसभा, मा.विशाल खत्री मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ,मा. श्री.कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच आदरणीय श्री. किशोर दर्डा जि. कार्यालय प्रमुख लोकमत यवतमाळ यांच्य उपस्थितीत हाॅटेल व्हेनिशियन,जांब रोड,यवतमाळ येथे पार पडला.डॉ.अनुश्री पुरी (बन) यांना लोकमत यवतमाळ गौरव अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद.अध्यक्ष जय नाईक सचिव, सौ.मोहिनीताई नाईक व डाॅ.व्ही के.जाधव प्राचार्य श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातील,पुसद तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.प्रा.डॉ अनुश्री पुरी (बन) यांनी आयोजक,महाविद्यालय, परिवाराचे व मित्र परिवारांने अभिनंदन करून शुभेच्छां दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close