ईतर

डॉ. अमेय डुबेवार यांना एम.एस. पदवी

पुसद : येथील प्रतिष्ठित व्यावसायिक व सेवानिवृत्त वन लेखापाल अनिल सुधाकर डुबेवार आणि असेगावकर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका संध्या डुबेवार यांचे सुपुत्र डॉ. अमेय अनिल डुबेवार यांनी एम. बी. बी. एस. नंतर एम. एस. (जनरल सर्जरी) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.डॉ. अमेय यांनी यापूर्वी एस.एस.सी. व एच. एस. सी. परीक्षेत पुसद शहरातून प्रथमक्रमांक मिळवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली होती.त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथून एम. बी. बी.एस. पदवी पूर्ण करून याच महाविद्यालयातून एम.एस. (जनरल सर्जरी) पदवी संपादन केली. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, परिवारातील सदस्य आणि शिक्षकवृंदांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close