ईतर

पुसद तालुक्यातील किसान मार्केट यार्ड शेलु ला वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्रदान!

पुसद: तालुक्यातील शेलु येथील किसान मार्केट यार्डला नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सामायिक पुरस्कार पुसद येथील किसान मार्केट यार्डचे संचालक गिरीश अग्रवाल

यांनी बुधवारी (ता. १) स्वीकारला.पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश उद्योजक अग्रवाल यांना सोपविण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी मंत्री अविनाश

नाईक, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, सचिव दीपक पाटील, बकुळ पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले तसेच अग्रवाल कुटुंबातील यशेश, रुबीन, श्रुती, प्रियंका हे सदस्य उपस्थित होते. या किसान मार्केट यार्डमधून शेतमालाची खरेदी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन करण्यात येते.पुसद परीसरातील शेतकऱ्यांसाठी खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती शेलु येथे उभारण्यात आली आहे. त्याचाही लाभ परीसरातील शेतकऱ्यांना होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close