ईतर

ॲड. आशिषभाऊ पंजाबराव देशमुख यांचा सपत्नीक श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न! 

पुसद : येथील ॲड. आशिष पंजाबराव देशमुख यांची ‘बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या कार्यकारिणीत सदस्य पदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल नवनियुक्त सदस्य ॲड. आशिष पंजाबराव देशमुख व त्यांच्या सौभाग्यवती अनुप्रिताताई देशमुख यांचा सपत्नीक भव्य स्वरूपाचा कौटुंबिक सत्कार तथा कौतुक सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद च्या वतीने २५ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद चे देवराव पाटील चोंढीकर सभागृहात सानंद स्वरूपात संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएट डीन, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संचालक डॉ. विजयराव माने, सत्कारमूर्ती आशिष भाऊ देशमुख अनुप्रिताताई देशमुख, विशेष उपस्थिती म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर , उपाध्यक्ष सुभाषरावजी देशमुख, सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर , संचालक काशीराव पाटील, साहेबराव पाटील, ॲड. अर्चनाताई माने विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके व सन्मानचिन्ह देऊन ॲड. आशिषभाऊ देशमुख व सौ अनुप्रिताताई देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती ॲड. आशिषभाऊ देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की, हा माझ्या एकट्याचा सत्कार नसून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाचा सत्कार आहे. या संस्थेने माझ्या यशात मोलाचा वाटा निर्माण केलेला आहे. ही निवडणूक अत्यंत कठीण व संघर्षाची असूनही आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी सहजपणे लढू शकलो. ही आपली ऊर्जा आहे. डॉ. विजयराव माने यांनी आशिष भाऊ देशमुख यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या रूपात आपल्या संस्थेचा प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी निवडून आलेला आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले व सर्वांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गजानन जाधव यांनी केले. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close