पुसद तालुक्यातील मरसूळ येथील आश्रम शाळेत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

पुसद: तालुक्यातील मरसूळ येथील आश्रम शाळेत सर्व आदिवासी समाजातील संघटनेच्या वतीने इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांची १९३ वी जयंती आज १२ मार्च २०२६रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांच्या व्हि.सी मधील आदेशान्वये क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्याचे सुचना शाळेला दिल्याने या आश्रम शाळेत विविध कार्यक्रमाचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळा मरसुळ चे माध्य. मुख्याध्यापक ए.जी. सय्यद सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक एस.के. जाधव सर हे होते.सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते. या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना जाधव सर, गोरटे सर,पाझारे सर, परसुवाले सर यांनी क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी गोंडवाना महायोद्धा वीर बापूराव शेडमाके यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. तसेच निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. एकंदरीत ह्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी.चव्हाण सर यांनी तर आभार प्रदर्शन वाय.आय. परसूवाले सर यांनी केले.



