ईतर

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पोदार लर्न स्कूल,पुसदचे घवघवीत यश! १३ सुवर्ण व १० रौप्य पदकांची कमाई!

पुसद : विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल साठी तसेच संपूर्ण पुसदवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत १३ सुवर्ण व १० रौप्य अशी एकूण २३ पदके पटकावली आहेत. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा TAFTYGAS व भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. ०३ जानेवारी २०२६ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत नेपाळ येथे पार पडली.या स्पर्धेत भारतासह नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश आदी विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विजेते ठरले होते. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. विद्यालंकार पोदार लर्न स्कूल पुसदच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एक वेळा हे सिद्ध करून दाखविले की, आम्ही अभ्यासासोबतच खेळातही अव्वल आहोत. शाळेमध्ये अभ्यासासोबतच नियमित खेळाचेही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य प्रशिक्षकाद्वारे मार्गदर्शन केल्या जाते आणि त्यामुळेच हे विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत विविध पदकांचे मानकरी ठरले आहेत.

🏐 व्हॉलीबॉल
१७ वर्षांखालील मुले – सुवर्णपदक

आदित्य संतोष पवार, वरद संदीप शिंदे, साईराम अनिल करे, सुयश बालाजी कानडे, दिव्यम अमोल दळवी, नित्यम जनार्दन बावणे, अविष्कार अजय गरड, आरुष अमित भोपी, जय प्रकाश भोसले

१४ वर्षांखालील मुले – रौप्यपदक

कश्यप विनोद मनवर, आर्यन संतोष मारकड, अंश सुमित राठोड, सोहम प्रशांत पांडे, मयूर रणजित राठोड, गौरव इंदल चव्हाण

🏸 बॅडमिंटन
१४ वर्षांखालील मुले – सुवर्णपदक

रोहन रामदयाल चौधरी, मयंक उमेश राठोड

१७ वर्षांखालील मुले –रौप्यपदक
राहुल रामदयाल चौधरी

🏃‍♂️ अ‍ॅथलेटिक्स
१४ वर्षांखालील मुले – सुवर्णपदक

समर्थ अंकुश मारकड (१०० मीटर धावणे)

१७ वर्षांखालील मुले- सुवर्णपदक 

नैतिक लक्ष्मण पोपळघाट (१०० मीटर धावणे)

रौप्यपदक – जय महेंद्र कांबळे (लांब उडी)

🥋 तायक्वांदो
१७ वर्षांखालील मुले – रौप्यपदक
वरद संदीप शिंदे, सुशांत सतीश आढाव या नेत्रदीपक यशामागे मुख्य प्रशिक्षक श्री. सुधाकर लिंबाजी खराटे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सहायक प्रशिक्षक श्री. ऋषिकेश अविनाश येरावार यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद मैंद, सचिव श्री.. सुरज डुबेवार, उपाध्यक्ष श्री. संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री. मनिष अनंतवार, सहसचिव श्री. संगमनाथ सोमावार तसेच प्राचार्या सौ राधा धागमवार, उप-प्राचार्या सौ राखी तगडपल्लेवार, प्रशासकीय अधिकारी श्री गोविंद निमडगे, समन्वयक सौ सविता सुपे, श्री सचिन मिसे, सौ वृषाली खांबाडकर, शारिरीक शिक्षक श्री सुधाकर खराटे,श्री संदीप तासके व श्री सुनील यादव तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशामुळे विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलने आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे, शहराचे व देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close