ईतर

आदिवासी समाजाच्या हितासाठी महाविकास आघाडीला कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा!

पुसद : येत्या २ डिसेंबर रोजी पुसद नगर पालिकेचे निवडणुक होवू घातले आहे. या बाबत आदिवासी समाज जागृत झाला आहे. महायुतितील तीनही घटक पक्ष बंजारा समाजाला अनु. जमातीचे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. बंजारा समाजाचे मंत्री आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी बंजारा समाजाला पाठिंबा देत आहेत, मोर्चे काढत आहेत. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष आदिवासी समाजाच्या मुळावर उठले आहेत. आदिवासी समाजाच्या सवलती इतरांना मिळु न देण्यासाठी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असुन अध्यक्ष पदासाठी उभ े असलेले डॉ. नदिम (काँग्रेस पंजा) व प्रभागातील काँग्रेस, राकाँ श.प., शिवसेना उबाठा, यांच्यापुढील पंजा, तुतारी, व मशाल या चिन्हा समोरील बटन दाबुन महाविकास आघाडीला विजयी करावे असे आवाहन एका प्रसिध्द पत्रकातुन आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी केले आहे. सदर पत्रकावर शामराव व्यवहारे, रामकृष्ण चौधरी, नारायणराव कऱ्हाळे, श्रीराम अंभोरे, ज्ञानेश्वर तडसे, भगवान डाखोरे, रंगराव काळे, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे, नाना बेले, हरिदास बोके, मनोहर कुरकुटे, तोलबाजी चिरंगे, मारोती भस्मे, परशराम डवले, देविदास डाखोरे, अतिश वाघमारे, पंजाब वंजारे, बाळु तडसे, दत्तराव कपाटे, सत्येभान सरकुंडे, रंगराव भडंगे, शंकरराव तोडकर, दगडु टारफे, शंकरराव इंगळे, किसनराव कुरकुटे, प्रकाश बेले, विठ्ठल वाघमारे व राजु माहुरे याची नावे आहेत. ते आपल्या पत्रकात म्हणतात की, आदिवासी समाज हा आमिषाला बळी पडुन मतदान करतो. हा समज म्हणजे आपल्याला लागलेला कलंक आहे. तो आता आपण पुसुन टाकला पाहिजे. आपले मुलं, नातु, पंतु आता शिकवुन समजदार होत आहेत. या पार्श्वभुमीवर आपण आपल्या समाजाच्या हित अहिताचा विचार करुन मतदान केले पाहिजे. येणारे न.प.चे सरकार असे की, जि.प. पं.स. असो की राज्य सरकार व केंद्र सरकार असो आपल्या भल्याच े आहेत काय ? याचा विचार मतदानाला जाण्यापुर्वी आपल्याला करावा लागणार आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. असा दुबळा विचार करु नका आपले एक मत हे दान आहे. आणि दानाची किंमत नसते, आणि आपले मतदान अमुल्य आहे हे ध्यानात ठेवा. अनु. जमातीमध्ये बंजारा समाजाचा हैद्राबाद गॅझेटचा दाखला देत समावेश करण्यासाठी दोन मंत्र्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. आणि त्यासाठी राज्यभर बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहे. बंजारा समाजाचा जर अनु. जमातींमध्ये समावेश झाला तर आपल्या समाजाचा बंजारा बांधवाच्या सोबत स्पर्धेत टिकाव धरेल का ? आज आपण आरक्षणाच्या आधारावर ज्या नौकऱ्या व राजकीय पद प्राप्त करतो ते सर्व उदया बंजार समाजाच्या राजकीय प्रभावाने आपल्याकडून हिसकावुन घेतील. आणि त्यांचेच अनु. जमातीमध्ये आमदार खासदार दिसतील मग तुमचे काय याचा विचार करा. केंद्रात व राज्यात असलेल्या सरकारची व आदिवासी बाबतची असलेली बेगडी भुमीका बगा. घुसखोरी करु पाहणाऱ्या सर्व जातीच्या मागणीचा विचार करुन वेगवेगळ्या समित्या स्थापन करणे त्या घुसखोर जातीचा आदिवासी समाजामध्ये करता येईल असे सकारार्थी आहावाल समित्याकडून तयार करुन ते केंद्राकडे पाठविणे आणि केंद्राला साकडं घालुन त्याचे कायद्यात रुपांतर करुन त्याचा मार्ग तयार करणे अशा प्रकारचे खऱ्या आदिवासीवर अन्याय करणारे प्रयत्न चालू आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय असुनही अधिसंख्य झालेले १२५२० पद अद्याप भरले नाही. पेसा कायद्याची अंमलबजावणी नाही. ८५हजार रिक्त पदाची भरती अत्यंत संथगतीने चालु आहे. बोगस कर्मचारी भरती केले जाते. व्हॅलिडीटी सादर करण्यासाठी संधी दिल्या जाते. आदिवासी मंत्र्यांचा निधी इतर वळविल्या जातो. त्यामुळे युतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांना मतदान देणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखे आहे. तेव्हा पर्याय म्हणुन आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नदिम आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करुन आपल्या समाजाचे हित रक्षण करावे असे पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close