राजस्थान मंडळची दीपावली मिलन व अन्नकूट उत्साहात संपन्न! राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्यासह१३००समाज बांधवांची उपस्थिती!

पुसद :राजस्थान मंडळ पुसद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अग्रवाल मंगल कार्यालयात अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला सकाळी ९:०० वाजे पासून लहान्यांनी वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले.राधाकृष्ण मंदिरात राजस्थान मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे यांनी सपत्नीक भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरती करण्यात आली. आरती नंतर राजस्थानी समाज बांधवांसाठी अन्नकूट प्रसाद ला सुरुवात करण्यात आली.
दिवाळीनिमित्त समाजातील प्रत्येकापर्यंत गोड जेवण पोहोचवण्याच्या उदिष्टाने अत्रकूट ची परंपरा राजस्थान मंडळ राजस्थानी समाजासाठी पार पाडत आहे. पारंपारिक व्यंजन अन्नकूट प्रसाद मध्ये देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्वजण तन,मन,धनाने मदत करीत असतात. अन्नकूट स्थळी कोणताही पदार्थ व्यंजन वाया टाकु नये च्या सुचना देण्यात येत होत्या. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात आली.
राजस्थान मंडळाच्या अन्नकूट प्रसादासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंञी तथा गोंदीयाँ जिल्ह्याचे पालकमंञी इंन्द्रनिल नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन प्रसाद ग्रहण केले.यावेळी राजस्थानी बांधवान तर्फे इंन्द्रनिल नाईक यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच इंन्द्रनिल नाईक यांनी वरीष्ठांचे आशिर्वाद घेतले व राजस्थानी समाज बांधवांना दिवाळी निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.
अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त राजस्थान मंडळ चे कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले व प्रसाद बनवण्यासाठी विशेषतः सुनिल इंन्नाणी,शिवा जाजु,विजय बोथरा तसेच राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी संघटन, अ यांचे योगदान लाभले.अग्रवाल मंडळ,राजस्थानी ब्राह्मण पंचायत, जांगिड समाज, अ. भा. मारवाडी युवामंच शाखा पुसद चे सहभाग प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ न देता नियोजन करण्यात आले होते.



