ईतर

पुसद जिल्हा भाजपामध्ये कार्यकर्त्यांची खदखद चव्हाट्यावर! राबलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संघटनात्मक निवडीतून वगळल्याने नाराज कार्यकर्त्यांतून तीव्र संताप!

पुसद : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हवामानातील बदलाने या परीसरात पाऊस चांगला झाल्याने थंडीचा पारा घसरला असताना इथले राजकीय वातावरण मात्र सध्या चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून लांबणीवर असतानाच त्यापूर्वीच अनेकांना पक्षांतराचे धुमारे फुटू लागले असून, अनेकांना आपल्या ताकदीचा उमाळा आला आहे. तर एकीकडे पुसद जिल्हा भाजपमध्ये चाललं तरी काय.?असा प्रश्न विचारला जावु लागला आहे.भाजप सत्तेत नसल्यापासून आजतागायत गेली अनेक वर्षे पक्षासाठी तळमळीने राबलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नुकत्याच झालेल्या संघटनात्मक निवडीमध्ये डावलले आहे. अडचणीच्या काळात ज्यांनी संघटनेची धुरा सांभाळली त्यांना पक्षाच्या सुवर्णकाळात कात्रजचा घाट दाखविला जात आहे.मात्र इतर पक्ष फिरून आलेले म्हणजे इधर चला मैं, उधर चला’ अशा काही संधीसाधूना पक्षांत संधी दिली जात आहे. ज्या कार्यकर्त्यांना मतदारसंघात किती गावे किती ग्रामपंचायती याचा अभ्यास नाही अशा कार्यकर्त्यावर तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे परंतु पक्षांतर्गत विविध आघाड्यांच्या नियुक्तीमध्ये संघटना वाढीसाठी पक्षाच्या पडतीच्या काळात वर्षानुवर्षे राबलेल्यांना किंवा एका विशिष्ट समूहाला सोयीस्कररित्या बाजूला केले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा नेतृत्वाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. पुसद जिल्हातून नाराजीची भूमिका जाहीर करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना पक्षातूनच ‘आऊट’ केले जात असल्याचा आरोप निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.यापुढे जिह्यातून कोणी अशी उघडपणे नाराजी व्यक्त करू नये असा संदेश देण्याऐवजी आशा निष्ठावंतांना जाणीवपूर्वक टाळले जात आहे.त्यामुळे येत्या काळात पक्षाच्या बिनीच्या शिलेदारांना मात्र भाजप मुकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात मजबूत केली त्यांना पक्षाकडून डावले गेले आहे.त्यामुळे बदलत्या राजकीय घडामोडींवर भाजपाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी भाजपने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.पण तालुका व आघाडी पातळीवरील निवडीमध्ये आघाडीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच ‘नारळ’ दिल्यामुळे संघटनात्मक बांधणीच्या कामाची गती मंदावण्याची शक्यता आहे.पार्टी विथ डिफरन्सचा धिंडोरा पिटणारा पुसद जिल्हा भाजप आज सर्वाधिक तिन-चार गटागटात विभागला आहे. कोण कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे हे मात्र संशोधनाचा विषय आहे. ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे काम सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संधी देऊ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची सोडवणूक कशी करता येईल ? याची जबाबदारी घेण्याऐवजी त्यांना जाणीवपूर्वक डावले जात आहे. या गटातटाच्या राजकारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मागील काळात जेवढ्या जागा भाजपने मिळविल्या होत्या त्या जागा सुद्धा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राखू शकतील की नाही असेच चित्र आहे.पंरतु तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच जिल्हा नेतृत्वाकडून बळ मिळत नसल्याने संघटनेची वाटचाल विकलांगतेच्या दिशेन सुरु असल्याची भाजप अंतर्गत कार्यकर्त्यामध्ये खदखद आहे. संघटनात्मक पातळीवर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडीतून पुसद जिह्यातील शेकडो कार्यकर्ते नाराज झाले असून आयुष्यभर आम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे काय ? संघटनेतील प्रमुख पद कधी मिळणार ? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.तर पक्षाचा एखादा कार्यक्रम असला की कार्यालयामध्ये येणारे पाच-पन्नास कार्यकर्ते म्हणजे पक्ष नव्हे. तर पुसद जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात आणि घराघरात आपला कार्यकर्ता असावा यासाठी भाजपचे अनेक कार्यकर्ते निस्वार्थीपणे राबत होते पण त्यांना प्रशासकीय पातळीवर लाभाचे पद राहू द्या, किमान संघटनेतील पद देऊन त्यांना बळ द्यावे अशी जुन्या कार्यकर्त्याची भावना आहे. पण जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष व आघाडी अध्यक्षांची निवड करताना जो अर्थिक सक्षम त्यालाच पद असे धोरण राबविले असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. बुथ पातळीवर राबण्यासाठी अथवा सभा, मेळावे, आंदोलनासाठी जुन्या कार्यकर्त्यांचा वापर आणि यापदावर मात्र प्रत्यक्ष इतर पक्षात फिरून आलेल्यांना किंवा बगलबच्च्यांना संधी देण्याची भूमिका पुसद जिल्हा नेतृत्वाने घेतली असल्याची सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना व खदखद आहे.पुसद जिल्हा भाजपात भाजपच्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिसरी पीढी जनसंघाच्या काळापासून आजपर्यंत कार्यरत आहे. पडत्या काळात प्रस्थापित मात्तबर विरोधकांना तोंड देत पक्षाचा विचार रूजवत कोणताही गट तट न स्थापन करता केवळ पक्ष हाच आमचा विचार अशी भूमिका घेऊन प्रामाणिक काम केले. पण आता देशात व राज्यात सत्ता आहे. पण दुर्देवाने जिह्यातील नेत्यांनी जिह्यात सत्ता टिकविता आली नाही. आपल्याच कार्यकर्त्यांचे खच्चिकरण करण्यामध्ये नेते मश्गूल झाले. कधीही विश्वासात न घेता पक्षात आयाराम गयारामना झुकते माप दिले जात आहे. आम्ही ज्या विचाराने पक्षाशी जोडले गेलो तो विचार सध्या कोणत्याही नेत्याकडे दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करणे शक्य नसून आमची व्यथा मांडायची कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असा प्रश्न भाजप कार्यकर्ते नाव न सांगण्याच्या अटीवर सांगित आहेत त्यामुळे पुसद जिल्ह्या भाजपात निष्ठावंत कार्यकर्त्याकडून खदखद व नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close