यूपीएससी’ परीक्षेत देशात ८४४क्रंमाक पटकाविणाऱ्या गटशिक्षणाधिकारी मोहीनी खंदारे यांनी जिद्दीच्या बळावर मिळविले यश..

पुसद : शहरातील रहिवासी असलेले व बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत यवतमाळ जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे. त्यांना देशभरातून ८४४ वा क्रमांक प्राप्त झाला असून, केंद्रीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे.मोहिनी प्रल्हाद खंदारे रा. ग्रीन पार्क पुसद येथील रहिवासी असून सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पी. डी. खंदारे यांची मुलगी आहे. मोहिनी यांनी शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात स्पर्धापरिक्षेचे धडे घेतले.त्यानंतर स्वतःच्या अभ्यासावर भर देत स्वयंमअध्ययनाद्वारे यश मिळविले. याआधी २०२१ मध्ये एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. आणि उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली. २०२३ मध्ये बुलढाणा पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदावर परिवीशाधीन कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले. सध्या त्या पंचायत समिती बुलढाणा येथे कार्यरत आहेत, शासकीय सेवेत कार्यरत राहून त्यांनी युपीएससी सारखी सर्वोच्च स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार केली ही गोष्ट अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यांच्या या प्रेरणेने पुसदच्या शिरात मानाचा तुरा रोवला आहे.



