ईतर

मिशन ग्रीन वृक्ष संवर्धनाकरिता पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा व पत्रकार दिन संपन्न!

माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन चा उपक्रम 

पुसद :माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदच्या वतीने दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी पत्रकार दिन मोठया उत्सहात भवानी माता टेकडी येथे साजरा करण्यात आला.प्रथम माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक व शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव,सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज,भवानी माता संस्थांनचे अध्यक्ष अशोकजी बाबर व उपस्थित पत्रकारबंधूच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर पुसद परिसरातील 80 पत्रकार बंधुचा सत्कार अशोकजी बाबर,दत्तात्रय जाधव काका, प्रभाकर टेटर, हरगोविंद कदम,पंकजपालजी महाराज व प्रशांत वानखेडे यांचे हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.

माणुसकीच्या भिंतीच्यावतीने सामाजिक उपक्रमा अंतर्गत मिशन ग्रीन तर्फे भवानी माता टेकडीवर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात येत आहे. येथे झाडांना पाणी साठविण्याकरिता अडचण येत होती. या करिता माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशनच्या वतीने पाण्याची टाकी बसविन्याकरिता मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत खालील दात्यांनी मदत देऊ केली .

माणुसकीची भिंत पुसद,राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर पुसद,रमेश डंबोळे पवन बोजेवारअमित हटवार,किरण किनाके,निखिल गादेवार,अमोल गंगात्रे,दीपक लासिनकर,संतोष देशमुख,परशराम नरवाडे,प्रवीर प्रकाशराव व्यवहारे,स्वातीताई वाट दळवी,अनिलभाऊ हरिदास राठोड,अरविंदभाऊ पवार,विजय रामराव पाटील,अनिल डुबेवार,सूर्यकांतभाऊ पोराजवार हेमंत काकडे एकूण रक्कम बत्तीस हजार वर्गणी मधून दोन हजार लिटरच्या दोन टाक्या व फिटिंग करिता लागणाऱ्या इतर साहित्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा या प्रसंगी पार पडला.भवानी माता टेकडीवर नियमित निशुल्क पाणी पुरवठा करणारे श्री दिनेश ठाकरे यांचा सुद्धा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश डंबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद,वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद व मिशन ग्रीन पुसदच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close