ईतरक्राइम

जनसंघर्ष अर्बन निधी लि.शाखा पुसदच्या खातेदार- ठेवीदारांत ठेवी परत न मिळाल्याने असंतोष;शेकडो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक करून बँकेचे अध्यक्ष फरार!

शाखा व्यवस्थापकाची शहर पोलीस ठाण्यात तक्रार 

पुसद :शहरातील जनसंघर्ष अर्बन निधी ली. शाखेच्या खातेदारांनी सुमारे १३ कोटी६४लाख४२हजार५३५ रुपयांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या होत्या मात्र, बँकेच्या अध्यक्षाच्या अनागोंदी कारभारामुळे बँक बुडीत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मागितल्या आहेत. मात्र, त्या अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांत असंतोष निर्माण झाला आहे. शेकडो लोकांच्या ठेवी घेऊन बँकेचे अध्यक्ष फरार झाले असल्याने  या शाखेचे व्यवस्थापक यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे तक्रार दाखल केली आहे. यामुळे शेकडो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात खातेदाराच्या व ठेवीदाराच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेडची मुख्य शाखा दिग्रस येथे आहे. त्याच्या इतर तालुक्यात सहा शाखा आहेत. त्यापैकी पुसद शाखेचा दि.२१ जानेवारी २०२१ रोजी शुभारंभ झाला होता.त्याचे अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे आहे.ठेवी गोळा करण्यासाठी ग्राहकांना व ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या रकमेची ठेवी स्वीकारल्या होत्या. परंतु बँकिंग व्यवसायातील आर्थिक सुरक्षिततेचे निकष सर्वसामान्यांना माहीती नसल्याने ज्यादा व्याजाच्या लालसेपोटी या बँकेत आपल्या ठेवी ठेवल्या त्याला बरेच खातेदार व ठेविदार बळी देखील पडले. जनसंघर्ष अर्बन निधी लि शाखा पुसद अडचणीत आल्याचे काही ठेवीदारांना लक्षात येताच ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मागितल्या आहेत. मात्र, त्यांना उडवा उडवी चे बँकेतून उत्तरे मिळू लागली त्यामुळे खातेदार-ठेवीदारांत असंतोष निर्माण झाला आहे.त्यानंतर दि.९ डिसेंबर २०२४ रोजी जमा केलेल्या ठेवी परत घेण्यासाठी गेलेल्या ठेवीदार व बँकेचे व्यवस्थापकाने दि.९ डिसेंबर रोजीच्या संध्याकाळी शहर पोलीस ठाणे गाठले.त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारासमोर शाखा व्यवस्थापकाने ठेवीची रक्कम देण्यास असमर्थ्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक वाळले यांनी संस्थेच्या अध्यक्ष विरोधात तक्रार दिली आहे. संस्थेच्या अध्यक्ष मार्फतच ठेवीची रक्कम मिळत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अशावेळी ठाणेदाराने ठेवीदाराची समजूत काढली आहे. यात विशेष बाब म्हणजे जन संघर्ष अर्बनच्या अध्यक्षांने सहाही शाखेत मधील मोठी रक्कम घेऊन व अधिकारी कर्मचाऱ्यांसह ठेवीदारांना वाऱ्यावर सोडून फरार झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close