राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुसद विधानसभा मतदारसंघात शरद मैंद यांना उमेदवारी जाहीर!
पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना होणार!

पुसद : विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद यांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडुन उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष यांनी पुसद शहरात सामाजिक कार्याचा वसा घेतला असून भारती मैंदं पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून शहरात अनेक लोकउपयोगी कामे केली आहे.शरद मैंद यांनी “समाजाचे काही देणे लागते” या भावनेतून या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त गावांची शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शरद मैंद हे नेहमी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असल्याने त्यांनी भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातुन पुरग्रस्तांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्यांच्या २००० किट्स वाटप केल्या शेतकरी व शेत मजुरांना आर्थिक मदत केली. तर ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीन पत्राचे वाटप केले. अगग्रस्त कुटुंबांना घरी बांधून दिली गोरगरिबाला मदत करणारे शरद मैंद हे उच्चशिक्षित असुन त्यांनी समाजीक कार्यात मोठा ठसा उमटविला आहे त्यांच्या या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दखल घेऊन त्यांना पुसद विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे पुसद विधानसभा मतदारसंघात सर्व समाजामध्ये उत्स्फूर्त व नवा दिवस निर्माण झालेला दिसत आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही नवा जोश निर्माण झालेला दिसत आहे.त्यांचे सर्व स्तरावरून तिकीट मिळाल्यामुळे शरद मैंद यांच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनचा वर्षाव होताना मतदार संघात दिसत आहे.



