Uncategorizedईतर

यवतमाळ जिल्हा बँकेत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारी: माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण व त्यांचे सुपुत्र अनुकूल चव्हाण यांच्या खात्याची निष्पक्ष चौकशी झाल्यास मोठे घबाड उघड होणार असल्याची चर्चा!

यवतमाळ/प्रतिनिधी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनेक शाखांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असून अमरावती विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेच्या ९४ शाखांच्या चाचणी लेखा परीक्षणाचे (टेस्ट ऑडिट) आदेश दिले आहेत. यात बँकेच्या गेल्या पाच वर्षांमधील ‘आर्थिक गैरप्रकार संशयित’ खात्यांची तपासणी केली जाणार आहे. या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे शाखांची नियमित तपासणी करत असतात. त्यांनी यवतमाळ शहरातील एका शाखेची तपासणी केली असता त्यांना तब्बल ८४ हजार रुपये हिशेबात कमी आढळून आले. या गैरप्रकारामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून कारवाईही होणार आहे. जिल्हा बँकेत वर्षभरात अनेक शाखांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून गैरव्यवहाराची रक्कम कोट्यवधींमध्ये आहे. अनेक शाखांमध्ये असाच प्रकार घडले असल्याचा संशय संचालक मंडळाला आहे. यामुळेच एकाच ठिकाणी वर्षांनुवर्षे ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

पुसद तालुक्यात जांबबाजार शाखेतील गैरव्यवहार अंतर्गत तपासणीत सापडला. आतापर्यंत ४ कोटी रुपयांवर गैरव्यवहाराची रक्कम पोचली आहे. या शाखेसोबतच सर्वच शाखांमधील गैरव्यवहार आणि अंकेक्षण न झालेल्या शाखांकडेही बँकेच्या हितचिंतकांनी लक्ष वेधले. जांबाजा सल्लागार विकास सहकारी संस्थेची तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार ३४ लाख ४१ हजार ६३० रुपये रक्कमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे या शाखेतील सलग नाहीतर सहा ग्रामविकास सहकारी संस्थांच्या मागे तीन वर्षाचा आर्थिक व्यवहाराची तपासणी केली असता १ कोटी ब१२ लाख ९५ हजार ५०४ रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा निदर्शनास आले आहे.विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांच्याकडे अशोक बाबर पंजाबराव देशमुख खडकेडे यांनी तक्रार ही दाखल केल्या आहेत त्या तक्रारीची विभागीय सहनिबंधक यांनी दखल घेतल्याने बँकेच्या सर्व ९४ शाखांच्या ‘चाचणी लेखा परीक्षणा’चे आदेश दिले आहेत. यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक जगदीश गवळे यांची नियुक्ती केली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ बँकेच्या इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरला आहे. त्या कार्यकाळातील भ्रष्टाचारामुळे त्यांना विविध स्तरांवरच्या चौकशांना तोंड द्यावे लागले होते. त्यातील काही प्रकरणे आजही न्यायप्रविष्ट आहेत.तर बँकेचे माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण व त्यांचे सुपुत्र अनुकूल चव्हा ऐनण यांच्या खात्याची निष्पक्ष चौकशी झाल्यास मोठे घबाड उघडे पडणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे.त्यामुळे विजय चव्हाण यांच्या बँकेच्या सर्व खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची तपासणी या ‘चाचणी’त होणार आहे. तसेच १९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बँक कर्ज समितीत मंजूर कर्ज प्रकरणांचीही चौकशी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close