गुणवंत विद्यार्थी सत्कार व निवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न;यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटने चा स्तुत्य उपक्रम!

पुसद :यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने नुकतेच माध्यमिक, उच्चमाध्यमिक व विविध क्षेत्रातील पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते दि,२५ऑगस्ट२०२४ रोजी सहकार भवन यवतमाळ येथे मोठ्या थाटामाटात सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रामुख्याने सालाभरा प्रमाणे याही वर्षी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्थिरोग तज्ञ डॉ. व्ही. के. गिरी तर प्रमुख पाहुणे तथा मुख्य वक्ते प्रा. वसंत गिरी, सहाय्यक पोलीसनिरीक्षक अमोल पुरी, सहाय्यक वन संरक्षक संदीप गिरी, डॉ. अशोक गिरी, दशनाम समाज गोसावी समाजाचे अध्यक्ष संदीप बळवंत गिरी, माजी अध्यक्ष प्रफुल्ल पुरी, संघटनेचे सचिव दिलीप पुरी, कार्याध्यक्ष पवन बन यांचे उपस्थितीत समाजातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला-वानिज्य पदवी सह माध्यमिक,उच्च माध्यमिक, परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या ६० गुनवंतांना भावी काळात समाजाच्या प्रेरणा पाठीशी रहाव्या या उदांन्त हेतूने प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे आपल्या प्रशासकीय ह्यातित उत्तम कार्य पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी बांधवांना समाजिक जिवनात जगण्याची नवी उर्जा मिळावी म्हणून सुध्दा सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते तथा लेखक प्रा.वसंत गिरी सर यांनी आपल्या मनोगतात गुणवंता सह पालकांनाही राष्ट्र निर्मितीत मोलाची भुमिका निभवावी लागणार आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोल पुरी यांनी गुनवंतांनी नव्या उर्जेने काळाची आव्हाने स्विकारून पुढे जायला हवे असे सुचवले तर अध्यक्षिय मनोगतात समाज भुषण असणारे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. व्ही.के.गिरी यांनी यशस्वी सामाजिक जीवनाचे गमक हे माणसाच्या निरोगी दैनंदिनीत दडलेले असुन तेव्हा युवकांनी सुदृढ बालक देशाचे मालक होवून आपले योगदान दिले पाहिजे असे आवाहन करून शुभेच्छा देत आपल्या मनोगताची सांगता केली. प्रामुख्याने जिल्हा दशनाम संघटनचे वतिने मीनाताई गिरी, अपर्णा पुरी, वैशाली गिरी, दिपा पुरी, कौसल्या पुरी, अर्चना गिरी, कोषाध्यक्ष योगेश गिरी उपाध्यक्ष सुहास पुरी, दिपक गिरी, रणजीत गिरी संघटक दिलीप सुखदेव पुरी, राजु गिरी, अविनाश भारती, चंद्रकांत गिरी, दिपक गणेश गिरी, नितीन गिरी, किशोर गिरी, गजानन भारती महागावकर , मनोज गिरी, राहुल पुरी, संदीप पुरी, अरुण गिरी , राजकमल भारती, मनिष बन, दिलीप गिरी, कैलास पुरी, आशिष गोसावी, गजानन गिरी आदिंनी गुनवंताचा सन्मान केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटने अध्यक्ष संदीप गिरी यांनी तर आभार जिल्हा सचिव दिलीप पुरी यांनी मानले. तर कार्यक्रमाचे संचलन बनताई यांनी आपल्या ओघवत्या शैलीत पार पडले.यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील गुनवंत विद्यार्थ्य्या सह पालक व महिला आणि पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे मात्र विशेष.



