जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात एनर्जी इको क्लबची स्थापना!

पुसद:‘लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट’ हा पर्यावरण रक्षणासाठी जीवन जगण्याचा मंत्र आहे. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘एनर्जी इको क्लब’ची स्थापना केली.शाळेच्या परिसरातील हिरव्याकंच वृक्षाखालीइको क्लबच्या स्थापनेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना या इको क्लबच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली. मिशन लाइफ इको क्लब आपल्याला पर्यावरण रक्षण करण्याची प्रेरणा देते असे सांगून त्यांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कसा टाळता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. हवामान बदलामुळे होणारे पर्यावरण बदल, जागतिक तापमान वाढ, प्रदूषण यासंदर्भात विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यासाठी हा इको क्लब उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी इको क्लब ची समिती गठीत करण्यात आली. मार्गदर्शक डॉ. माधवी गुल्हाने, समन्वयक वर्ष इंगळे, पंकज गावंडे, इको क्लब चे अध्यक्ष विद्यार्थी प्रेम छत्रपाल बिसने यांनी कार्यकारणी घोषित केली. उपाध्यक्ष संजना चव्हाण, सचिव रक्षा चव्हाण. यावेळी क्लबचे सदस्य ओम जाधव, संजना चव्हाण, रक्षा चव्हाण, प्राची मांडवडे, श्रुती राठोड, शिवम गादेकर, निखिल राठोड, भक्ती राऊत, वैष्णवी जाधव, कृष्णा पौळ, सतीश राठोड, सोनू फाळके, अक्षरा चव्हाण, दक्ष आडे, अक्षरा आडे, अनुप चव्हाण, प्रसाद मोरे, अंश जाधव, प्रथमेश राठोड, प्रतीक राठोड, विनोद आडे, हर्षद चव्हाण, अदिती सुपले, रुद्र पवार, खुशी खंदारे या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज गावंडे यांनी केले. आभार वर्षा इंगळे यांनी मानले.



