नगर पालिकेचे काम म्हणजे चांगलेच दाम.’ काम कमी आणि नफा जास्त, याच सूत्रामुळे आता नगरसेवक (सद्यस्थितीतील माजी)बनले ठेकेदार- सौ.पंचशीला कांबळे माजी नगरसेविका यांचा खळबळजनक आरोप!

पुसद: नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात होणारे विविध विकासकामात नाल्या साफसफाई शहराची, स्वच्छता,शहरातील घाण कचऱ्याचा विल्हेवाट तसेच पुसद शहरातीची भौगोलिक दृष्ट्या वाढती व्याप्ती बघता राज्यस्तरीय महायोजने अंतर्गत शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी ६७.६० कोटी रुपयाचा निधीमधील योजनेचे काम सुरू आहेत पण ही संपूर्ण योजनेची पाईपलाईन शहरात जिथे लोक वस्ती आहे. तिथे पाईपलाईनचे काम करण्यात येत नसल्यामुळे नवीन लोक वस्ती नसणाऱ्या प्लॉटींग ले-आउट मध्ये या पाईपलाईनचे काम झपाट्याने सुरू आहे तसेच घंटागाडी बंद पण नाल्या साफसफाई कामगार यांचे बिले मात्र तारीख न चुकता काढल्या जात असुन नगर पालिकेचे काम म्हणजे चांगलेच दाम.’ काम कमी आणि नफा जास्त, याच सूत्रामुळे आता नगरसेवक (सद्यस्थितीतील माजी) ठेकेदार बनल्याचा खळबळजनक आरोप सौ.पंचशीला राहुल कांबळे यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना तक्रार देऊन शहरातील रस्ते नाल्या तसेच ठीक ठिकाणी घाणीचे साचलेले ढिगारे या विविध समस्याचे तात्काळ निरासन करून घ्यावे अन्यथा राजू दुधे पाणीपुरवठा सभापती यांनी घेतलेल्या विविध समस्येच्या बाबत तक्रारी दिल्या आहेत त्यामुळे त्यांना आंदोलनासाठी आम्हालाही पाठिंबा आहेअसे लेखी निवेदन दिले आहे .
सध्या पुसद नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेच्या वतीने पावसाळा सुरू असताना सुद्धा नियोजन शून्य कामकारामुळे संपूर्ण शहर घाणीच्या विळख्यात असल्याने नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शहरात दुर्गंधी पसरलेली असून पावसाळ्याच्या तोंडावर डेंगू मलेरिया सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होउन सामान्य नागरिकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते तसेच शहरातील रस्ते संपूर्ण खड्डेमय झालेले आहे नगरपालिका मध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराला जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे– . सौ. पंचशीला कांबळे,माजी



