Uncategorizedईतर

बँकेने पीक कर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न: खाजगी रुग्णालयात शेतकऱ्यांची मृत्यूशी झुंज!

पुसद: यंदा मान्सून वेळेआधी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून म्हणजेच ३० मे ला केरळात दाखल झाला आहे. यानंतर मान्सून महाराष्ट्रात लवकरच पोहोचेल याची उत्सुकता लागली आहे.तसेच मृग नक्षत्र तोंडावर आला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येऊन लवकर पेरणी करण्यासाठी शेतकरी उत्सुक झाले आहेत. मात्र पेरणीसाठी बियाणे कोठून आणायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. आधीच शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने ग्रासले असताना या शेतकऱ्यांना दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत आहेत.एकीकडे बँक पैसे देईना, तर दुसरीकडे सावकार उभा करेना, अशा परिस्थितीत खरिपाची पेरणी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना तालुक्यातील एका शेतकऱ्याला संबंधित बँकेच्या एका सोसायटीच्या शाखेने पिककर्ज नाकारल्याने त्यांने सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल करून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून हा शेतकरी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झुंज देत आहे.याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती असेल की, पुसद तालुक्यातील उल्हासवाडी येथील रहिवासी शेतकरी बापूराव हौसाजी दांडेगावकर यांची समायीक शेती अनसिंग शिवारात असून श्रीरामपूर येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती शाखेकडे त्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला होता परंतु त्याला बँकेने पिककर्ज नाकारले.शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्याला ज्या बँका कर्जासाठी त्रास देतील,अशा बँकाच्या शाखाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा या शेतकऱ्याला कर्ज नाकारले. त्यामुळे शेतकऱ्याचे मनोधैर्य खचले.अधिच अस्मानी सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. कधी कधी अचानक अवकाळी पाऊस गारपीट होते. तर पाऊस मुसळधार पाऊस येतो. त्यामध्ये संपूर्ण पीके उद्ध्वस्त होतात. त्यामुळे एकही रुपया हाती न लागता उलट कर्ज वाढते. हाच कर्जाचा बोजा असह्य झाल्यावर आपला शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करतो वारंवार शेतकऱ्यांनी बँकेकड चकरा मारून सुद्धा या बँकेच्या सोसायटीच्या हेकेखोर शाखाप्रमुखाने शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक केली असून किमान शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता तरी त्यांना सहानुभूतीपूर्वक वागणूक देऊन कर्ज प्रकरण तत्काळ मंजूर करणे गरजेचे होते.आठवड्याभरात पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज वितरण लवकर हाेणे गरजेचे आहे. परंतु या बँकेच्या कर्मचाऱ्यांना मात्र कर्तव्याचा विसर पडलेला दिसून आल्याने. त्यामुळे एकीकडे बँक पैसे देईना, तर दुसरीकडे सावकार उभा करेना, अशा परिस्थितीत खरिपाची पेरणी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना या शेतकऱ्याचे कर्ज नाकारल्यामुळे या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले असून सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल करून विष प्रांशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून या शेतकऱ्यांला दि.३१मे२०२४ रोजी १२:०० वाजण्याच्या सुमारास पुसद येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो शेतकऱी मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला दोन मुले एक मुलगी व पत्नी असा अपत्य परिवार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्याला कर्ज नाकारणाऱ्या संबंधित बँकेच्या व सोसायटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
  • याशिवाय यावर्षी सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे,बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे यासाठी शेतकरी शेतात ट्रॅक्टर किंवा बैलाच्या सहाय्याने नांगरणी सुरु केली असून मशागतीचे कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तर अशी परिस्थिती असतांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाणांचे आणि खताचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे तर शेतकर्‍यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.पिक कर्जाच्या भरोशावर शेतकरी आपली शेती करत असतात त्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत पिक कर्जासाठी पायपीट करावी लागत आहे. खरिपाच्या पेरणी, मशागतीसाठी बी- बियाणे खरेदी खत कीटकनाशक खरेदीसाठी अडचणींना समोर जावे लागण्याची शक्यता असून बँका व सहकारी सोसायटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्या जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असुन काही ना काही कारणं दाखवून शेतकऱ्यांना पीक कर्ज न देता धूडकावून लावत आहेत असे चित्र पहावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close