शैक्षणिक
श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ शाळेचा निकाल ९६.४२ टक्के लागला ,निकालाची परंपरा कायम

पुसद :दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रीमंती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ ,ता पुसद शाळेचा दहावीचा निकाल ९६.४२ टक्के लागला आहे. शाळेने यावर्षी देखील आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री मंगीलालदादा चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज चव्हाण , शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाल एम चव्हाण यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेमधील सर्व शिक्षकवृंद यांच्या नियमीत तासिका व विद्यार्थ्यांचा सराव करून घेतल्यामुळे यामुळे हे शक्य झाले.



