पुसद : येथील पूस नदी तीरावरील मुखरे बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून मध्ययुगीन काळातील गद्यगळ शिळालेख आढळून आला आहे. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असतांना, मात्र पुरातत्त्व विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हा शिलालेख अडगळीत पडलेला आहे.त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता असतांना ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद शहरातील पूस नदी तीरावरील मुखरे बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून मध्ययुगीन काळातील गद्यगळ शिळालेख धूळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे,हा शिळालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करत आहे. त्यामुळे मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मध्ययुगीन काळातील शिलालेख हा त्या वेळेच्या राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा आहे.हा शिळालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करत आहे.यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे ‘गधेगळ’ हा शिळालेख. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेल असल्याच्या जाणकारांचे मत आहे. केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ असल्याचे मानले जाते. शिळालेखावर वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असून खालच्या टप्प्यात यावर एक प्रतिमा कोरलेली आहे यात एक गाढव आरूढ होऊन बळजबरी समागम करताना दिसत आहे” इतिहास संशोधकांच्या मते अशी प्रतिमा शिळालेखाला ‘गधेगळ’ हे नाव पडलं. म्हणजेच शिळालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पळणार नाहीत, त्यांच्या सोबत असे कोणते कृत्य केले जाईल अशी ती धमकी आहे.”तर या गधेगळांवर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल असं सांगितलं जाते की, “‘आ चंद, सूर्य नांदो…’, म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असे पर्यंत ही आज्ञा कायम राहील म्हणून यावर चंद्र, सूर्य कोरलेले असतात.” गधेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा संदेश असल्याचे बोलल्या जाते. असा हा शिळालेख १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याने हा दुर्मिळ शिळालेख असल्याचा जाणकाराचं मत आहे. त्यामुळे अहा शिळालेख आपला इतिहास उलगडतो. ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्वाचा असल्याने या शिळालेखाकडे त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावाउपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.