जागतिक आरोग्य दिवस ह्या विषयावर ज्ञानदान कार्यक्रम संपन्न-व्ही.बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश – १,

पुसद :मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार तसेच तालुका विधीसेवा समिती, पुसद व वकिल संघ, पुसद यांचे संयुक्त विद्यमाने पुसद येथील न्यायालयातील कँटीग हॉलमध्ये ‘जागतिक आरोग्य दिवस’ हया विषयावर ज्ञानदान कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. व्ही. बी. कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद यांनी सखोल मार्गदर्शन केले. मंचावर मा. श्री. एन. बी. जाधव, २ रे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, मा. श्री. एन. जी. व्यास, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, मा. श्री. डि.जी. म्हस्के, सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, मा. श्री. व्ही. एस. वाघमोडे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, मा. श्री. व्ही. बी. चव्हाण, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद आवर्जुन उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमामध्ये श्री. एन. जी. व्यास व श्री. डी.जी. म्हस्के साहेब यांनी सर्वप्रथम मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी तरुण पिढीने शारीरीक आरोग्य योग्य राखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री. एन.जी. व्यास साहेबांनी निरोगी आरोग्यासाठी मानसिक आरोग्य चांगले ठेवणे खुप गरजेचे आहे. सदरच्या कार्यक्रमामध्ये श्री. डी.जी. म्हस्के साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शरीर दुर्बल असेल तर माणुस कोणतेही काम करु शकत नाही त्यामुळे शरीर सक्षम ठेवणे गरजेचे आहे.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. व्ही. बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधिश-१, पुसद यांनी शारीरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे फार महत्वाचे आहे व ते टिकविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. आजच्या जीवनात शारिरीक व मानसिक आरोग्याचा समन्वय राखणे व दोन्ही प्रकारचे आरोग्य टिकविणे हे खरे आवाहन ठरत असल्याचे म्हटले. शारिरीक आरोग्य टिकविण्यासाठी मैदानी खेळ खेळणे फार गरजेचे आहे. आजच्या पिढीमध्ये मैदाणी खेळामध्ये उदासीनता असल्याचे दृश्य दिसुन येते ज्यावेळेस शरीर सक्षम नसते त्यावेळेस मानसिक आरोग्य बिघडते.मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी योगासने व ध्यानसाधना करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य निकोप असल्यास जिवनामध्ये उत्साह व आनंद हा व्दीगुनीत होतो म्हणुन जिवनामध्ये सतत सकारात्मक दृष्टीकोनअसला पाहिजे असे कथन केले. कोणालाही तुच्छ समजु नये व व्देश करु नये. मनुष्य जिवनात शरीर व मनुष्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जिवनात सुख प्राप्त करण्यासाठी शरिराची जशी काळजी घ्यावी लागते तसेच मन समाधानी असल्याशिवाय मानसिक आरोग्य मिळु शकत नाही. त्यामुळे शरीर तसे मनाने सुदधा निरोगी राहणे हे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात मानसिक आरोग्य बिघडत असल्याने जागतिक पातळीवर दखल घेतल्या जात आहे. जी व्यक्ती नेहमी आनंदाने वावरत असते त्या व्यक्तीचे सामाजीक आरोग्य निकोप असते त्या व्यक्तीला नविन कोणतीही गोष्ट शिकण्याची मानसिक तयारी असते. निकोप मानसिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सतत प्रयत्नशिल असले पाहीजे दुस-याला जो व्यक्ती आनंदी करतो तोच खरा आनंदी असतो. मानसिकदृष्टया सुदृढ व्यक्ती आपल्या गुणदोषांची नेहमी दखल घेत असतो कारण त्यांच्यामध्ये आत्ममान्यता आणि आत्मदात्म्यता आढळुन येतो. मानसिकदृष्टया निरोगी व्यक्ती हा नेहमी सहनशील असतो ती व्यक्ती कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी गोंधळुन जात नाही व योग्य निर्णय घेते. स्वतःची क्षमता मर्यादासंबंधी शारिरीक व मानसिक निरोगी व्यक्तीला पुरेपुर जाणीव असते. मानसिक व सुदृढ व्यक्ती कधीच स्वस्थ बसलेला नसतो तो व्यक्ती सतत समाजासाठी कार्य करीता असतो व विधायक कार्यात वेळ खर्ची करतो.मानसिक आरोग्य हे समजुतपणा, समाधानीपणा व नियमित जिवनशैलीने राखता येते. मानसिक आरोग्य बिघडल्यास मनोविश्लेषणाच्या सहाय्याने त्याला जागेवर आणता येते, असे प्रबोधन मा. श्री. व्ही.बी. कुळकर्णी न्यायाधिश साहेब यांनी अत्यंत सोप्या पदधतीने उपस्थितांना व पक्षकारांना समजावुन सांगितले. सुत्रसंचालन अॅड. ममता सगणे यांनी केले तर आभार अॅड. सुचिता नरवाडे यांनी सुनियोजीत पध्दतीने पार पाडले.या कार्यक्रमाला अॅड. श्वेता पांढरीपांडे, अॅड. सुशिला नरवाडे, अॅड. अमोल भालेराव, अॅड. इमरान चव्हाण, अॅड. सविता आढाव, अॅड. वर्षा कावडे तसेच इतर पुसद येथील वकील संघातील सदस्य त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी श्रीमती. काळबांडे, अधिक्षक, श्री. भोयर, श्री. यावले, श्री. मदणे, श्री. भलगे, श्री. डाफ, श्री. चौधरी, श्री. खसाळे, कु. बेले, श्री. जोशी तसेच पोलीस कर्मचारी, सामान्य नागरीक आदी उपस्थित होते.



