सकल मराठा समाज योग भवनाचे भुमीपुजन संपन्न !

पुसद:राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन मिळालेल्या २कोटी रु च्या निधीतून पुसद येथे सकल मराठा समाजाच्या मराठा समाज योग भवनाची निर्मिती होणार आहे.प्रस्तावित योग भावनाचा भूमिपूजन समारंभ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचे हस्ते काल रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्व.दिनेश जाधव यांच्या घरासमोर येरावार -जाधव ले आउट च्या खुल्या भूखंडमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष व निमंत्रक शरद मैंद यांनी सकल मराठा समाज योग भवन उभारणीमागची भूमिका विषद करीत जागा उपलब्ध करून दिल्या बद्धल माजी मंत्री मनोहर नाईक, माजी नगराध्यक्ष सौ.अनिता नाईक आमदार एड. इंद्रनिल नाईक , तत्कालीन मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड, विद्यमान मुख्याधिकारी अभिजित वायकोस तसेच निधी उपलब्ध करून दिल्या बद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भावना गवळी यांचे आभार व्यक्त केले. खासदार भावना गवळी यांनी आपल्या भाषणात सदर योग भवनासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत वर्धा नांदेड रेल्वे दीड वर्षात पुसद ला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, आमदार इंद्रनिल नाईक,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सदस्य एड, आशिष देशमुख, भाजप पुसद जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे,मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन मनिष अनंतवार तर आभार भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष एड. भारत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आसावरी नितीन पवार हिने जिजाऊ वंदना सादर करून मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी व्यासपीठावर भारती मैंद नागरी सह. पतसंस्थाचे अध्यक्ष एड. अप्पाराव मैंद, जेष्ठ भाजप नेते एड. माधवराव माने,शिवसेना जिल्हा प्रमुख एड. उमाकांत पापीनवार, जेष्ठ शिवसेना नेते राजन मुखरे स्थानापन्न होते. कार्यक्रमाला शेकडो समाजबांधव भगिनी उपास्थित होत्या.प्रभाग क्र.14मध्ये भव्य योगा भवन होत असल्याबद्दल यासाठी पुढाकार घेणारे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचा परिसरातील नागरिकांनी हृदय सत्कार केला हे येथे उल्लेखनीय.



