ईतर

व्हीसीए खैरागड चषक आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा;केदार जगतापची नाबाद १४२ रणची खेळी!

पुसद  : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपुर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खैरागड चषक आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात स्थानिकचा खेळाडू केदार कैलास जगतापने आज पहिल्या दिवशी अखेर १४२ धावाची नाबाद खेळी केली

वर्धा व यवतमाळ जिल्हा संघात उपांत्य सामना मोरघडे क्रिकेट अकादमी येथे ता.११ सुरू झाला. वर्धा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु त्यांनी केवळ १५८ धावाच केल्या. यातील पाच बळी यवतमाळ च्या पुष्पक गुजरला मिळाले. यवतमाळ संघाकडून हेमंत राठोड ने ४५ चेंडूत७३ धावा काढल्या तर केदारने कप्तानी पारी खेळत आज दिवसाअखेर नाबाद १४२ धावा काढल्या. यात २२ चौकाराचा समावेश आहे.

पहिल्या दिवसा अखेर यवतमाळ संघ तीन बाद २८० वर असून १२२ धावाची आघाडी घेतली आहे. यवतमाळ संघाचा कप्तान केदार हा येथील पत्रकार कैलास जगताप यांचा मुलगा आहे. या चषकाचा अंतीम सामना अमरावती येथे ता. १४ मार्च ला होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा संघ व्हीसीएचे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close