ईतर

मोठी बातमी! पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे ४घर सदृष्य गोठ्याला भीषण आग ;एका वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू!

पुसद  :तालुक्यातील सिंगरवाडी येथे दि. ८ मार्च २०२४च्या रात्री ११.३० च्या सुमारास चार घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका ७५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी सुभाष थावरा पवार वय ५० रा.सिंगरवाडी हे आपल्या कुटुंबासह रात्री जेवण करून आपल्या घरात आराम करीत असताना, रात्री ११.३० च्या सुमारास समोरील त्यांचे वडील राहत असलेल्या घराला भीषण आग लागल्याचे दिसले. त्यांनी तातडीने व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले

समोरील गोठ्यात वडील मृतक थावरा भोजू पवार वय अंदाजे ७५ वर्ष हे असल्याने गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग आडे वडगाव येथील पोलीस प्रकाश चव्हाण व इतर गावकऱ्यांनी तातडीने पुसद येथील अग्निशमन विभागाच्या वाहनाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अचानक लागलेल्या या आगीला आटोक्यात आणले व आग विझविली. यामध्ये एकनाथ भिका जाधव, अनिल सिताराम पवार, केशव फकीरा राठोड यांच्या घर सदृश्य गोठ्याला आग लागली होती.

सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळतात  बीट जमदार हे आपल्या सहकार्यासह  अग्निशमन विभागाची गाडी वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. ९ मार्च रोजी सकाळी सदर घटनेचा पंचनामा करण्याकरिता तहसीलदार महादेव जोरवर व त्यांचे सहकारी मंडळ अधिकारी पथक घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पंचनामा केला असून उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे मृतक थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता दाखल केले. मात्र आगीचे कारण मात्र अस्पष्ट असून मात्र या दुर्घटनेत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या वतीने पीडित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबातून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close