ईतर

भाजपा किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी महेश नाईक यांची नियुक्ती

पुसद: भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी ही नियुकती भाजपा प्रदेश कार्यालय ,मुंबई येथून जाहीर केली असून ही नियुकती तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

किसान मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष खासदार श्री अनिलजी बोंडे व श्री.वासुदेव नाना काळे यांच्या कार्यकारणी महेश नाईक यांनी किसान मोर्चाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पदी कार्य केलेले आहे.या माध्यमातून त्यांनी गेल्या तीन वर्षांत शेतकरी हिताचे प्रश्न विविध आंदोलनाद्वारे लावून धरले होते. जिल्ह्यातील पीक विमा धारक ४ लाख ६८हजार शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी iffco Tokiyo या पीक विमा कंपनी व तत्कालीन आघाडी सरकार विरूद्ध मोठे आंदोलन उभारले होते .यात त्यांच्यासह भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर रस्ता रोको आंदोलनचे गुन्हेही आघाडी सरकारने लावले आहेत.या त्याच्या कार्याची किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी विशेष दाखल घेऊन त्यांची तत्काळ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याचे बोललो जाते.या त्यांच्या नियुक्ती बद्दल महेश नाईक भाजपा विदर्भ संघटन महामंत्री डॉ. उपेन्द्रजी कोठेकर, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार श्री अनिल बोंडे ,किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री गणेश तात्या भेगडे,भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष श्री.महादेवरावजी सुपरे,आमदार ऍड.श्री नीलयजी नाईक यांचे आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या विविध योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.तसेच भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पूर्तीसाठी” किसान मोर्चाचे माध्यमातून परिश्रम करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा सरचिटणीस अमेयजी नाईक,ओबीसी जिल्हाध्यक्ष शेखर वानखेडे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष ओमप्रकाश शिंदे,उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजयजी पाण्डेय,जिल्हा सचिव विश्वजित सरनाईक,विजयजी पुरोहित, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम काळबांडे बाळासाहेब उखळकर् आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close