ईतर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुसद मूळराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन!

पुसद:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुसद पुसद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.तालुक्यात अति पावसाने जगाचा पोशिंदा उघड्यावर आला आहे. मात्र, शासन कुंभकर्णी झोपेत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाईसुद्धा थंडबस्त्यात आहे. शासनाच्या कोरड्या घोषणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचले असून जगाचा पोशिंदा मेटाकोटीला आला आहे. याकरिता शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले असून या निवेदनात नमूद केलेले मुद्दे अशी की,चालू वर्षात अति पावसामुळे पुसद तालुक्यातील शेतकऱ्याचे व शेतीचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलीचे मोफत शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, चालू वर्षात परतीचा पाऊस न आल्याने पिके सुकून वाळून गेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे शासनाने याबाबत महसूल विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, तसेच शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोरवेल व विहिरी खोदल्या असून पाण्याची व्यवस्था केली परंतु विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नेहमीच वीज पुरवठा करावा आणि कृषी पंप साठी सोलर सिस्टम बसविण्यासाठी तात्काळ आदेश द्यावे, चालू वर्षी सोयाबीनवर येलो मोजक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी नापीके मुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी किंवा त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वाभिमानाने जगता येईल त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून त्या गावात किंवा त्या भागात एखादा छोटा उद्योग चालू करण्यासाठी त्या कुटुंबाला दोन लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून जर सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या नाहीतर पुसद मुळराष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या आंदोलन छेडण्यात येईल अशा आशियाचे निवेदन माधवराव वैद्य मूळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर साहेबरावदादा ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष , जिल्हा सरचिटणीस, दीपकभाऊ जाधव,जिल्हा सरचिटणीस, नानाभाऊ जळगावकर पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य , शहर अध्यक्ष शाकिब शाह,अयूब खान महबूब खान पटेल ,शब्बीर भाई ,नैनेश्वर नगुजी वाट, विट्ठल कनाडे,बिलाल भाई, दादाराव सुरोशे, सय्यद कयूम, पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close