ईतर

हिवरा संगम येथील आठवे शक्तीपीठ एकविरा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी !

महागाव /प्रतिनिधी- (संदीप कदम)-यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला दि.१५ ऑक्टोंबर रवीवारला दुपारी २ वाजता वैदिक मंत्रउच्चारात घटस्थापना करून सुरुवात झाली अष्टादक्ष शक्तिपीठांपैकी आठवे शक्तीपीठ असलेल्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

सिंहासन रूढ असलेले मातेचे रूप मनोहरी स्वरूपाचे आहे एकविरा मातेच्या रोज सकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी परिसरातील व गावातील भाविक भक्त रोज उत्साहाने उपस्थिती दर्शवितात सर्व भक्तांना आरती व त्यानंतर तांबुळ असलेला प्रसाद दिला जातो

आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या सभागृहात नवही दिवस अखंड तेवत राहणारी मनोकामना ज्योत ३५० भाविकांनी लावली आहे माता सतीच्या शरीराचे भाग ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी माता भाविकांच्या कल्याणासाठी स्थित झाली असून त्यापैकी उजवा बाहू पडून माता स्थित झालेले ठिकाण म्हणजे हिवरा संगम येथील आठवे शक्तिपीठ आई एकवीरा देवी मंदिर हे पूस नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे.

एकविरा मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश यासह देशाच्या कानाकोपऱ्यापासून अनेक भाविक दर्शनासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात संस्थांनच्या वतीने यात्रेकरू भाविकांसाठी खास सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे .

सामाजिक कार्यात संस्थांच्या वतीने नेहमीच पुढाकार घेतला जातो पूर, भूकंप, कोरोना काळात शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आर्थिक मदत देणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी- बियाणे वाटप करीत आपले सामाजिक दायित्व जोपासले आहे.

यावर्षी सहायक धर्मादाय आयुक्त यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थांच्या वतीने हिवरा संगम, अनंतनगर, खडका, थार(बुद्रुक) येथील ४०० पूरग्रस्त साडीचे वाटप केले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील तसेच त्यांच्या पत्नी गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्रीताई हेमंत पाटील यांनी काल एकविरा मातेचे मनोभावे दर्शन घेतले व येथील विश्वस्थ सोबत चर्चा केली एकविरा मातेचे मंदिर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरून १०० मी तर आतमध्ये असून नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर आहे एकविरा देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता असून महामार्ग लगत येणाऱ्या भाविकांसाठी लवकरच लोकसहभागातून स्वागत कमान उभारण्यात येणार आहे यासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान कोषाध्यक्ष साहेबराव पाटील कदम यांनी केले आहे संस्थान तर्फे दसऱ्याच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे संस्थानला ब दर्जा मिळावा यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे संस्थांचे अध्यक्ष- अनंतराव कदम, उपाध्यक्ष- डॉ. धोंडेराव बोरुळकर, सचिव- आनंदराव कदम, – साहेबराव पाटील कदम, यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ मेहनत घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close