ईतर

पुसद शहरात डेंग्यूचा पहिला बळी!

पुसद: शहरातील शिवाजी वार्डातील रहिवाशी असलेल्या गणेश रामदेव डोडिया वय १८ वर्षाच्या तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला असून पुसद तालुक्यातील पहिला डेंगू चा बळी ठरला आहे.थंडी ताप आल्याने गणेश ला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर लवकर निदान न झाल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. गणेश ला दि.१४ ऑक्टोंबर रोज शनिवारी उपचारांसाठी शहरातील सुप्रसिद्ध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तब्येत अचानक खालावल्याने त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आले. गणेश वर उपचार सुरू होते व आज दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गणेश हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता ऐन तारुण्यात असा अचानक दगावल्याने गणेश ची आई हंबरडा फोडून रडत होती. गणेशच्या मित्रांसह  वार्डातील नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. यावर्षी त्याने बारावी सायन्स परीक्षा पास केली होती. शांत व मनमिळाऊ स्वभावाचा गणेश हा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पुसद शहरामध्ये डेंगू ची लागण मोठ्या प्रमाणावर झाली असताना पुसद नगरपरिषद प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. पुसद शहरातील सर्व प्रभागांमध्ये नप प्रशासनाने अद्यापही कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही. त्यामुळे डासांचा चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढला आहे व नागरिकांना डेंगू व मलेरिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. न. प.प्रशासनाने नाल्यांवर फवारणी करावी अशी जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.

◼️ गणेश डोडिया हा डेंगू पॉझिटिव्ह होता. दोन दिवसांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आले होते. पेशंट ला डेंगू इन्फ्लुजा झाला होता. आम्ही त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु यश आले नाही.

डॉ. संजय अग्रवाल संचालक, मेडिकेअर हॉस्पिटल पुसद,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close