ईतर
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत वणीतील एका तरुणाचा मृत्यू

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : शहरातील भिमनगर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुण सिध्दार्थ मरकवाडे दि. २८ सप्टेंबरला रात्री चंद्रपूर येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत एका बॅन्ड पथकात बॅन्ड वाजविण्यासाठी चंद्रपूर येथे गेला होता. बॅन्ड वाजवीत असताना अचानक त्याला चक्कर येऊन खाली कोसळला असता त्याला तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिद्धार्थच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेने संपूर्ण परीसरात शोककळा पसरली आहे.



