ईतर

गुंज ते माळेगाव नदीवरील तुटलेल्या पुलावरून नागरिकासह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा धोक्याचा प्रवास!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-तालुक्यातील गुंजवरून माळेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुलाचे काम मागील दोन वर्षांपासून चालू आहे व जुना पूल खचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे जुना पूल कमी उंचीचा असल्यामुळे वारंवार पुराचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो तासनतास येथील वाहतूक ठप्प होत आहे.

वारंवार पुराच्या समस्येमुळे येथील नागरिकांनी संबंधित विभागाला निवेदने दिले आंदोलने केली त्यामुळे येथे नवीन पूलाला मंजुरी मिळाली व नवीन पुलाचे कामाला सुरुवात झाली, मात्र ठेकेदार संथगतीने काम करीत असल्याने मागील दोन वर्षांपासून अजुन ही या पुलाचे काम पूर्ण झाले नाही, २१ व२२ जुलैला झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे येथील नवीन पुलाचा काही भाग वाहुन गेला तसेच जुन्या पूल क्षतिग्रस्त झाला,

त्यामुळे नवीन पुलाचे अर्धवट काम व जुनापुल क्षतीग्रस्त झाल्याने येथील नागरिकांना लहान मुला मुलींना महिलांसह जीव धोक्यात घालून पुलावरून पाण्यातुन धोक्याचा प्रवास करून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे या नवीन पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी येथील शालेय विद्यार्थी, नागरिकाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close