ईतर

हिवरा संगम परीसरातील नागरीक अनियमित व खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त !

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम)-यवतमाळ जिल्ह्यासह महागाव तालुक्यात सुद्धा दि.२१ व २२ जुलैला ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यापासून हिवरा व परिसरात विज पुरावठा सतत अनियमित होत असून सतत खंडीत होत असलेल्या विज पुरवठ्या मुळे तेथील नागरीक त्रस्त झाले आहे हिवरा संगम हे बाजारपेठे असल्यामुळे तसेच बँकासह विविध कार्यालय कामकाजासाठी परिसरातील अनेक

नागरिक येथे येत असतात सध्या तरदिवसा उष्णतेचा कहर आणि घरातील गायब झालेली विज यामुळे संपूर्ण कुटूंब उकाड्याने हैराण होवून विजेच्या येण्याची वाट पाहतानाचे चित्र सध्या महागांव तालुक्यातील हिवरा संगम सह परिसरातील अनेक गावात दिसुन येत असून विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे येथील जनता विज वितरण कंपनीच्या अशा ढीसाळपणावर नाराजी व्यक्त करून बोलताना दिसत असुन विजेचा लपंडाव मात्र दिवस रात्र सुरुच राहत आहे. या मुळे घरातील वृद्ध आणि लहान मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे. बि. पी. शुगर आजारी व्यक्तीचा जीव टांगणीला लागला आहे. महावितरण कंपनी नेहमीच कारणे सांगून हात वर करतात अशी चर्चा स्थानिक नागरीक करताना दिसत आहे. सतत होत असलेला विद्युत पूरवठा सुरळीत ठेवून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close