ईतर

“गेले ते कावळे व राहिले ते मावळे” -ॲड.अशिष देशमुख;पुसद येथे शरद पवार यांच्या मूळराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न!

पूसद:राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन राष्ट्रवादी पक्ष दुभंगला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले.तर पुसद मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटात सामील झाल्याने या मतदारसंघातील नांगरिकांनी मुळराष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटात राहण्याची सहमती दर्शविल्याने हा गट बंडखोरांविरुध्द आक्रमक झाला असून. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निश्चिय केला आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याने राज्याप्रमाणेच पुसद येथे राष्ट्रवादी पक्षात दोन गट तयार झाले.त्या अनुषंगाने शरद पवार समर्थक राष्ट्रवादी पक्षाची कार्येकर्ता संवाद बैठक दि.१ सप्टेंबर रोजी गुणवंतराव देशमुख विद्यालयातील सभागृहात जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रदेश अध्यक्ष ऍड.आशीष देशमुख यांचे नेतृत्वात पार पडली या बैठकीस व्यासपीठावर ऍड आशिष देशमुख, जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई निकम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भास्करराव पंडागळे, माजी जिओ सदस्य साहेबराव पाटील कदम,प्रा. शिवाजी राठोड, दत्तराव गंगासागर, अशोक बाबर, सुरेश धनवे, माजी नगरसेवक राजू दुधे, साहेबराव ठेंगे, माधव, वैद्य, ऍड.अनिल ठाकूर, अतिक शेख, दीपक जाधव, अनावर अली, दीपक जाधव, महागाव तालुकाध्यक्ष गोविंदराव देशमुख, नितीन पवार, फईम अहेमद, युवती जिल्हाध्यक्षा कु.शीतल कुरडकर, याडीकार प्रा.पंजाबराव चव्हाण, आदिवासी सेवक श्रीराम आंबोरे, ऍड.ए.ए. खान, ऍड.सविता आढाव, ऍड.वर्षा कावडे आदीजन विराजमान होते.  ऍड.आशिष देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात शरद पवार विचारांचे वादळ देशात कधीच शमणार नसल्याचे सांगत आगामी निवडणुका शरद पवारांच्या विचारधारेनेच लढणार असुन या मतदारसंघात मुळराष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणणार असल्याचे आश्वासित केले. पक्ष सोडून गेलेल्याना आम्ही घाबरत नाही “गेले ते कावळे व राहिले ते मावळे..” असे विधान करीत उपस्थित राष्ट्रवादी कार्येकर्त्यांमध्ये स्फुरण भरण्याचा प्रयत्न केला. तर जिल्हाध्यक्षा सौ .वर्षाताई निकम यानी भाजपाला २०२४च्या निवडणुकीची भीती असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पाडल्याचे सांगत भविष्यातील सर्वच निवडणुकीत शरद पवारांच्या विचार धारेतील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्या जाणार असल्याचे जाहीर केले. विचाराने तरुण असणारी माणसं नेहमी संघटनात्मक बाबतीत शरद पवारांसारखी तरुण असतात असे सांगत सत्तेशीवाय न्याय मिळत नसतो म्हणून आपणास शरद पवारांच्या नैतृत्वातील सत्ता स्थापित करण्यासाठी सर्वांनी पक्षकार्ये करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्येकर्त्याना केले. यावेळी यजिमबॅचे संचालक प्रा.शिवाजी राठोड, भास्करराव पंडागळे, माजी जीप सदस्य प्रा.सुरेश धनवे,ऍड.अनिल ठाकूर, शेषराव पाटील जिनिंगचे संचालक दीपक जाधव,आदिवासी सेवक श्रीराम अंभोरे, अभियंता अनवर अली आदींनी आपल्या भाषणात अजित पवार गटावर तोंडसुख घेतले. सदर कार्येकर्ता संवाद बैठकीचे सूत्रसंचालन नाना जळगावकर, प्रास्ताविक ऍड.आशीष देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन अशोक बाबर यांनी केले.संवाद बैठक यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक साकीब शहा, स्वप्नील जैस्वाल, नवाज अली, हर्षद देशमुख, दीपक अवचार, शिवाजी ठेंगे,ऍड.जावेद वर्षांनी, ऍड.नितीन जाधव, शेख आहाद, ऍड.प्रशांत ठाकरे, प्रशांत देशमुख, ऍड.गजानन सुर्येवंशी, ऍड.मिसबा खान,ऍड.यासीर सैय्यद, ऍड.तलहा मिर्झा, ऍड.जोहा मिर्झा, ऍड.जांबज खान, अब्दुल सत्तार, आदींनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close